प्राथमिक शिक्षक समितीचा वर्धापनदिन सेवाभावी उपक्रमांनी संपन्न

    महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला शाखेमार्फत सभासद नोंदणी, वृक्षारोपण आणि कातकारी समाजातील मुलांना आरोग्यविषयक सेवा पुरविण्यात येऊन सेवाभावी उपक्रमांनी वर्धापनदिन साजरा करण्यात आला.

    सभासद नोंदणी व संफ अभियानाचा शुभारंभ करताना तालुका शाखेमार्फत कोकण विभाग सचिव संतोष परब यांना प्रातिनिधीक स्वरूपात सभासद पावती देण्यात आली. त्यानंतर मठ-कणकेवाडी शाळेमध्ये राज्य व जिल्हा पदाधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तर वेताळबांबर्डे येथील नाग्या महादू कातकरी वसतीगृहाला भेट देऊन तेथे वास्तव्यास असलेल्या मुलांना आवश्यक असणारी औषधे आणि खाऊचे वाटप करण्यात आले. येथील मुलांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या आरोग्यदायी, दर्जेदार शिक्षणासाठी वेंगुर्ला तालुका शाखेमार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले. वसतिगृहाचे संचालक उदय आईर यांनी या उपक्रमालाबद्दल शाखेचे आभार मानले. या सर्व कार्यक्रमांना कोकण विभाग सचिव संतोष परब, जिल्हा कोषाध्यक्ष कालिदास खानोलकर, तालुका कार्याध्यक्ष किरण मुडशी, शिक्षक समिती जुनी पेन्शन आघाडी सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख शंकर वजराटकर, जिल्हा कार्यालयीन चिटणीस कर्पूरगौर जाधव, तालुकाध्यक्ष प्रसाद जाधव, शिक्षक पतपेढी वेंगुर्ला शाखा संचालक सिताराम लांबर, विभागीय अध्यक्ष प्रकाश भोई, तालुका सचिव रामा पोळजी, अंतर्गत हिशोब तपासनीस रामचंद्र मळगावकर, महिला आघाडी अध्यक्ष ऋतिका राऊळ, महिला आघाडी सचिव सरोज जानकर, महिला आघाडी शिक्षक नेत्या नेहा गावडे, मठ केंद्र संघटक राजश्री भांबर, सल्लागार एकनाथ जानकर, सिद्धेश्वर मुंडे, कणकेवाडी शाळेचे मुख्याध्यापक वीरधवल परब आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu