संगीत तपस्वी पुरस्काराने सचिन पालव सन्मानित

संगीताच्या लखलखीत प्रकाशाने आपल्या जीवनातील अंध:कार दूर करणाऱ्या वडखोल वेंगुर्ले येथील सचिन भालचंद्र पालव यांना शाश्वत सेवा बहुद्देशीय संस्था, समर्पण फाऊंडेशन, सचिन वालावलकर मित्रमंडळ व वेंगुर्ले शिवसेनेतर्फे संगीत तपस्वी हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. माजी शिक्षणमंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

      जन्मतःच अंधत्वाचे ओझं घेऊन आलेल्या सचिनने केवळ आपल्या जिद्दीच्या, मेहनतीच्या आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर संगीतातील गायन, हार्मोनियम वादन, तबलावादन आणि पखवाजवादन या चारही प्रमुख विद्यांमध्ये विशारद पदवी मिळवून दिव्यांगाने पीडित अनेकांचे मनोबल उंचावले आहे.

      सचिन वालावलकर मित्रमंडळाचे संस्थापक सचिन वालावलकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, संगीत नाटक क्षेत्रातील लोकप्रिय गायक नट जया गोरे, प्रसिद्ध कीर्तनकार तथा संगीत विशारद प्रा. प्रशांत धोंड, भाजपचे वेंगुर्ले तालुका मंडळ अध्यक्ष विष्णू उर्फ पपू परब, समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष सुहास कोळसुलकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, सचिन पालव यांचे वडील भालचंद्र पालव, शिवसेनेचे शहरप्रमुख उमेश येरम, ज्येष्ठ नाट्यकम संजय पुनाळेकर, युवासेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, शाश्वत सेवा बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा मिताली मातोंडकर, सचिव महेंद्र मातोंडकर, शिवसेनेचे तालुका संघटक बाळा दळवी, संतोष परब, समर्पण फाऊंडेशनचे पदाधिकारी जगदीश सापळे, शैलेश भोसले, स्वप्नील रावळ, गजानन मुणनकर, सुहास खोबरेकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu