दक्षिण कोरिया येथे नुकत्याच पार पडलेल्या २०व्या एशियन रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप २०२५ मध्ये विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाच्या नायशा मेहता व रिधम ममाणिया यांनी सोलो डान्समध्ये सुवर्ण पदक तर कॅरोलीन फर्नांडिस हिने रोलर डर्बीमध्ये रजत पदक पटकाविले. यासाठी त्यांना संकुलाचे अध्यक्ष अरविंद प्रभू, सचिव डॉ. मोहन राणे, महाराष्ट्र स्केटींग असोसिएशनचे अध्यक्ष पुष्पेंद्र सिंह, प्रशिक्षक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच श्रीमती सिंग आणि कोरियोग्राफर मोनिश कोटियन यांचे मार्गदर्शन लाभले.