आनंदवाडी येथील घरांचे महसूल विभागाकडून सर्व्हेक्षण

वेंगुर्ला-आनंदवाडी येथील गेली २०० वर्ष प्रलंबित राहिलेल्या लोकांच्या राहत्या घराचा प्रश्न हा महासंघाचे पदाधिकारी व आनंदवाडी ग्रामस्थ यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यावर पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी अनिल पाटील व महसूल विभागाला हा विषय अतिशय गंभीर असून त्यांचे निवारण तत्परतेने करायला हवे असे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर गेले दोन दिवस महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी आनंदवाडी येथील ग्रामस्थांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. त्यामुळे आनंदवाडी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या सर्वेक्षणावेळी महसूल विभागाचे तलाठी आर. जी.तांबोसकर, कोतवाल सुरेश मटकर यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून माहिती घेतली. यावेळी महासंघाचे जिल्हा संघटक अंकुश जाधव, ग्रामस्थ माजी उपनगराध्यक्ष वामन कांबळे तसेच सखाराम जाधव, जयंत जाधव, सुरेश जाधव, विकास जाधव, विठ्ठल जाधव, अजय जाधव, सत्यवान जाधव, शशांक जाधव, तेजस जाधव, राजन जाधव, महेंद्र जाधव, मोनाली जाधव आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu