ओरोस येथे शासकीय ध्वजारोहण संपन्न

भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त येथील पोलिस परेड ग्राऊंड मैदानावर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाला. यावेळी आमदार दिपक केसरकर, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्यसैनिक, वीरमाता, वीरपत्नी, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, नागरिक, माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.

    जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना २०२५-२६ अंतर्गत जिल्ह्याकरीता २८२ कोटी इतका निधी मंजूर झाला असून ८४ कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. चिपी विमानतळ विद्युतीकरण-२ कोटी ३८ लाख, सुशोभिकरण-१ कोटीचा आणि पीएम सुर्यघर योजनेअंतर्गत शासकीय कार्यालयांवरती सौर विद्युत प्रकल्पासाठी २ कोटीचा निधी देण्यात आला आहे. पर्यटनवाढीच्यादृष्टीने ‘झी सिने अवॉर्ड्स‘ समारंभ आपल्या जिल्ह्यात घेण्याचा मानस आहे. विजयदुर्ग व रेड्डी बंदराचा विकास करण्याचे नियोजन सुरू आहे. मुंबई-रत्नागिरी-सिंधुदुर्ग रो-रो सर्व्हीस गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे पालकमंत्री राणे यांनी सांगितले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा­यांना पालकमंत्री राणे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले. १५ वर्ष व त्यापुढील वयोगटातील या परीक्षेतील नवसाक्षरांचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला. नेत्रदान केलेल्या दात्यांच्या नातेवाईकांना आणि राज्य परिवहन सेवेत २५ वर्षे विनाअपघात सेवा करणा­या चालकांचा सपत्नीक गौरव करण्यात आला. जलतरण या क्रीडा प्रकारात आजपर्यंत केलेल्या अत्युच्च कामगिरीसाठी पूर्वा गावडे यांना गौरवपूर्वक सन्मानित करण्यात आले. शेतक­यांना पिक कर्ज मंजुरी पत्र देण्यात आले. जिल्हा प्रशासनातर्फे नियमानुसार पात्र नवीन तसेच मृत परवानाधारक व्यक्तींच्या वारसांना शेती संरक्षण शस्त्र परवान्यांचे वितरण करण्यात आले.

 

Leave a Reply

Close Menu