नवी मुंबई येथे पार पडलेल्या इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्ट मिस इंडिया २०२५ स्पर्धेत वेंगुर्ला, मठ-परबवाडा येथील अदिती परब हिने ‘मिस इंडिया २०२५‘ हा प्रतिष्ठाचा किताब पटकाविला. अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेली अदिती ही एक उत्तम नृत्यांगना आणि अभिनेत्री आहे. तिला फ्रेंच भाषेचे ज्ञान अवगत आहे. कु. अदिती ही कृष्णा आणि कृतिका परब यांची कन्या तर कै.चंद्रकांत व वैजयंती परब यांची नात होय. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अदिती सन २०२६ मध्ये संयुक्त राष्ट्र (युएसए)ला रवाना होणार आहे.