वेंगुर्ला शहरातील सागररत्न मत्स्य बाजारपेठ येथील दुस-या मजल्यावर उभारण्यात आलेल्या ‘नाईक जिम अँड फिटनेस सेंटर‘चे उद्घाटन आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते झाले. शारीरिक तंदुरुस्तीसाठी तरूणांना या सेंटरचा फायदा होईल असे आमदार केसरकर यांनी सांगितले. यावेळी मुख्याधिकारी हेमंत किरूळकर, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, उमेश येरम, हर्षद डेरे, सुहास गवंडळकर, प्रकाश नाईक, सोमनाथ टोमके, अखिल आरोसकर, कुणाल नाईक, अमित नाईक, आदित्य हळदणकर, शिवप्रसाद केरकर, पिटर डिसोझा, सागर चौधरी, श्वेता आरोसकर, सुजाता पडवळ, मोना नाईक, राखी दाभोलकर, वृंदा गवंडळकर, राधिका सकपाळ, प्रणाली अंधारी, दीपाली ठोंबरे, आकांक्षा परब, ईश्वर माने, श्रीकृष्ण पांगम, कृष्णा हळदणकर, अनिकेत आळवे, पंकज पाटणकर, नितीन परब, आर्यन गावडे, प्रवीण केरकर, राहुल मोर्डेकर, साईराज गिरप, राहुल हळदणकर, शुभम गावडे, अझिम मकानदार आदी उपस्थित होते.