कागल-करनूर येथे डॉ.नसिमादिदी संस्थापक असलेल्या साहस डिसएबिलीटि रिसर्च अँड केअर फाऊंडेशन, कोल्हापूरच्यावतीने दिव्यांग पुनर्वसन केंद्राचा भूमिपूजन समारंभ नुकताच डॉ.नसिमादिदींच्या ७६व्या वाढदिवसादिवशीच संपन्न झाला. आपण शेवटच्या श्वासापर्यंत दिव्यांगांसाठीच काम करेन असे प्रतिपादन डॉ.नसिमादिदी यांनी केले. याप्रसंगी सावंतवाडी येथील अॅड.नकुल पार्सेकर हे या भूमिपूजन समारंभात सहभागी झाले होते. २ एकर जागेत हे संकुल उभे राहणार असून यासाठी सुमारे १० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. नामांकित वास्तुविशारद बेरी यांनी दिव्यांगांच्या गरजा लक्षात घेऊन या संकुलासाठी सुंदर संकल्पचित्र रेखाटले आहे. कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ, लेखक व साहित्यिक डॉ.कुलकर्णी यांनी आपल्यावर दिदिंच्याच अफाट कर्तृत्वाचा प्रभाव असल्याचे सांगितले. विद्यमान कॅबिनेटमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे १९९३ पासून साहसला मदत करत आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्र हसन मुश्रीफ, खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती व माजी खासदार श्रीनिवास पाटील यांचेही मार्गदर्शन व सहकार्य मिळत आहे.