वेंगुर्ल्यातील ४४ मंडळांना भजन साहित्याची भेट

कोकणातील भजनी कलेचा वारसा जपण्याकरिता दरवर्षीप्रमाणे यंदाही सावंतवाडी मतदारसंघात भजनी साहित्याचे वितरण करण्यात आले. यावर्षी जिल्हा उपाध्यक्ष संदिप गावडे यांच्या माध्यामतून वेंगुर्ला तालुक्यातील सुमारे ४४ भजनी मंडळांना भजनी साहित्याचा लाभ देण्यात आला. यात तालुक्यातील ब्राह्मण सेवा मंडळ (वायंगणी), माऊली (वरची केरवाडी), वेताळ (तुळस), ब्राह्मण (वरचा सावंतवाडा), महापुरूष (वजराठ), इसवटी ब्राह्मण (पालकरवाडी), देसाईवाडा (परबवाडा), विठ्ठलादेवी (न्हैचिआड), पिपळेश्वर (अणसूर), मौलादेवी (मोचेमाड), दाडोबा (वेतोरे), गजानन (होडावडा), भराडी (कोचरे), जय गणेश (परूळे), कुलस्वामी (आंबेगाळी), शांतादुर्गा (म्हापण), लोपादर (आडेली), गव्हाणी (वायंगणी), गवळदेव (दाभोली), सातेरी (तुळस), गिरेश्वर-सातेरी-तळकर (वजराट), वंश ब्राह्मण (बागकरवाडा), सिद्धिविनायक (मळई), माटेकर (आरवली), गोठणेश्वर (रामघाट), साकवेश्वर (वेंगुर्ला), कुलदेवता (खानोली), मुंडये (शेळपी), सागरतीर्थ, शर्वाणी, भूमिका (पाल), खाजणादेवी (पाल), महापुरूष (मातोंड), नवार (उभादांडा), घुमटेश्वर (नवाबाग), धावडेश्वर (वेंगुर्ला), ब्राह्मण (सुखटणवाडी)बोवलेकर, नवकला, ब्राह्मण, हेळेकर (उभादांडा), ढोकमेश्वर (वेंगुर्ला), वांद्रेश्वर (सुंदरभाटले) आदी भजन मंडळांचा समावेश आहे. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी भजन मंडळांना २५००० रू. अनुदान दिल्याबद्दल तसेच गणेशोत्सव हा सण राज्य महोत्सव म्हणून घोषित केल्याबद्दल महायुती सरकारचे आभार मानले.

 

Leave a Reply

Close Menu