हापूस आंब्यावर गुजरातचा दावा

हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या डोळ्यासमोर येतो. केवळ भारतीयांच्याच नव्हे तर जगभरातील आणि प्रामुख्याने अमेरिका, ऑस्ट्रेलियातील खवय्यांना हापूसची गोडी लागली आहे. पण, याच कोकण हापूसवर आता गुजरातने दावा केला आहे. “वलसाड हापूस’ म्हणून भौगोलिक मानांकनाची मागणी केली आहे. त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. कोकण हापूसला 2018 मध्ये मानांकन मिळाले. समुद्र किना¬यावरील चार जिल्ह्रांत उत्पादित होणा¬या विशिष्ट आंब्यासाठी हे मानांकन आहे. या मानांकनामुळे कोकणातील हापूस उत्पादकांना सुरक्षित बाजारपेठेसह आर्थिक सुरक्षा मिळाली आहे. शिवाय कोकणातील शेतक¬यांचा मोठा आर्थिक स्त्रोतही आहे.  आता वलसाड हापूसला मानांकन मिळाले तर कोकणातील शेतक¬यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल, त्यामुळे आम्ही वसलाड हापूसला कायदेशीर विरोध करीत आहोत, अशी माहिती कोकण आंबा उत्पादक आणि विक्रेते संघटनेचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे यांनी दिली.

Leave a Reply

Close Menu