मठ हायस्कूल वाचविण्यासाठी शाळा बंद आंदोलन

    मठ येथील रायसाहेब डॉ.रा.धों.खानोलकर हायस्कूल ही शाळा शासन निर्णयानुसार शुन्य शिक्षकी जाहीर झाल्याने विद्यार्थी आणि शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे समायोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या संदर्भात 9 डिसेंबर रोजी कृती समिती, ग्रामस्थ, पालक, शिक्षणप्रेमी, स्थानिक लोकप्रतिनिधी व माजी विद्यार्थी यांच्यावतीने हायस्कूलसमोर “हायस्कूल बचाव – शाळा बंद आंदोलन’ करण्यात आले. याला पालक तसेच ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद लाभला.

                दरम्यान, या आंदोलनापूर्वी 8 डिसेंबर रोजी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली मठ शिष्टमंडळाने जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.खेबूडकर यांची भेट घेत सकारात्मक चर्चा केली. यावेळी मनिष दळवी यांनी याबाबत वरिष्ठ स्तरावर हा विषय घेण्यात येऊन शाळेला न्याय दिला जाईल, असे स्पष्ट केले. तर सल्लागार रवींद्र खानोलकर यांनी मठ गावाचा डोंगरी निकषामध्ये समावेश झाला असून महाराष्ट्र शासनाने त्वरित असे अन्यायकारक निकष न लावता शाळेच्या हिताच्या दृष्टीने अंमलबजावणी करावी, असे सांगितले.

                दि. 9 रोजी करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये सरपंच रूपाली नाईक, कृती समिती सल्लागार रवींद्र खानोलकर, कृती समिती अध्यक्ष दिगंबर परब, उपाध्यक्ष केशव ठाकूर, सचिव संतोष तेंडोलकर, नुतन हितवर्धक मंडळ मुंबईचे सदस्य प्रकाश मठकर, कमिटी सदस्य तुषार आईर, न्हानू गावडे, शैलेश राणे, कृष्णा मठकर, प्रीती परब, मयुरी ठाकूर, सुनिखी धुरी, ग्रामपंचायत सदस्य शमिका मठकर, संतोष वायंगणकर, महेश सावंत, कृष्णा मठकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलम गावडे, उपाध्यक्ष संजना तेंडोलकर, पोलिस पाटील अदिती परूळेकर, सतये पोलिस पाटील शमिका धुरी, माजी सरपंच किशोर पोतदार, सतिश गावडे, शिवराम आरोलकर, ओंकार परूळेकर, मिलिंद खानोलकर, उमेश गावडे, विद्याधर कडुलकर, आबा मठकर यांसह माजी विद्यार्थी, शिक्षणप्रेमी, पालक, ग्रामस्थ मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu