सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सात वैद्यकीय अधिकारी रुजू
अभिनव फाऊंडेशन, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान आणि युवा रक्तदाता संघ यांच्या जनहित याचिकेनंतर अखेर शासनाने दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सात कंत्राटी वैद्यकीय अधिकारी रुजू झाले. अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या मागणीला यामुळे मोठा दिलासा मिळाला असून, रुग्णालयातील आरोग्यसेवा आता अधिक सक्षम होणार आहे. …
