सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सात वैद्यकीय अधिकारी रुजू

अभिनव फाऊंडेशन, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान आणि युवा रक्तदाता संघ यांच्या जनहित याचिकेनंतर अखेर शासनाने दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सात कंत्राटी वैद्यकीय अधिकारी रुजू झाले. अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या मागणीला यामुळे मोठा दिलासा मिळाला असून, रुग्णालयातील आरोग्यसेवा आता अधिक सक्षम होणार आहे.      …

0 Comments
कोकमसाठी 30 लाख रुपयांची नुकसान भरपाई
Garcinia indica, a plant in the mangosteen family (Clusiaceae), commonly known as Kokum, Punar puli (tulu language), is a fruit-bearing tree that has culinary, pharmaceutical, and industrial uses.

कोकमसाठी 30 लाख रुपयांची नुकसान भरपाई

मे 2025 मध्ये अवकाळी पावसामुळे व वादळी वाऱ्यांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यातील 904 शेतकऱ्यांचे 101.65 हेक्टर आर एवढे क्षेत्र बाधित झालेले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे एकूण 30,02,685 रुपयांचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी शासनाकडून 30,03,000 एवढी नुकसानभरपाई महसूल व वन विभागाकडून जाहीर करण्यात आली…

0 Comments

पत्रा पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण, प्रस्तावही पाठविला

पावष पाऊस लांबल्यामुळे शहरातील रस्त्यांच्या डागडुजीची मंजूर कामे रखडली आहेत. आता पाऊस गेल्याने तात्काळ ती सुरू करण्यात येतील. 2022-23 सालात मंजूर झालेली काही कामे टेक्निकल प्रॉब्लेममुळे रखडली होती. त्यामुळेच तात्कालीन प्रशासनाकडून या कामांना गती मिळाली नव्हती. नियमानुसार या कामांसाठीचा मंजूर असलेला 2 कोटीचा…

0 Comments

महाराष्ट्र राज्य हौशी नाट¬ स्पर्धेच्या वेंगुर्ला केंद्रावरील प्राथमिक फेरीचा प्रारंभ

वेंगुर्ला येथील मधुसूदन कालेलकर नाट¬गृहात महाराष्ट्र राज्य हौशी नाट¬स्पर्धेच्या वेंगुर्ला केंद्रावरील प्राथमिक फेरीला प्रारंभ झाला आहे. या फेरीचे उद्घाटन ठाणे येथील ज्येष्ठ रंगकर्मी विष्णू केतकर यांच्या हस्ते झाले. स्पर्धा हे केवळ निमित्त आहे. हौशी रंगभूमीला आजही मोठ¬ा परिश्रमाने पदरमोड करून जिवंत ठेवणारे कलावंत…

0 Comments

मठ सोसायटीमध्ये सहकारी सप्ताह साजरा

  सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. व सिंधुदुर्ग जिल्हा सहकरी मंडळाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्रामध्ये 14 नोव्हेंबर ते 2025 अखेर सहकारी सप्ताह साजरा होत आहे. याचा शुभारंभ 19 नोव्हेंबर रोजी मठ येथील श्री स्वयंमेश्वर विकास सेवा संस्थेमध्ये सहकार मेळावा आयोजित करून करण्यात आला. यावेळी…

0 Comments

भगवान बिरसा मुंडा लाखोंसाठी प्रेरणास्थान!

बॅ.खर्डेकर महाविद्यालयात भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 15 नोव्हेंबर रोजी जनजाती गौरव दिवस साजरा करण्यात आला. वयाच्या पंधराव्या वर्षी भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासींच्या जमिनीच्या हक्कांसाठी आणि संास्कृतिक संवर्धनासाठी वसाहतवादी सैन्याविरूद्ध आवाज उठवला. त्यांचे नेतृत्व आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळे ते आजही लाखो लोकांसाठी…

0 Comments

निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांचे पथ संचलन

वेंगुर्ला नगरपरिषद निवडणूक 2025च्या पाश्र्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेऊन 13 नोव्हेंबर रोजी वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीत मॉब डिस्पर्सल व दंगा काबू योजना (पथ संचलन) राबविण्यात आली. या उपक्रमाचे मार्गदर्शन सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांनी केले. त्यांच्या उपस्थितीत पोलीस दलाने शहरात…

0 Comments

छाननी प्रक्रियेत नगराध्यक्षपदाचे 2 तर नगरसेवकपदाचे 24 अर्ज अवैध

              वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया 18 नोव्हेंबर रोजी निवडणूक निरीक्षक विवेक घोडके यांच्या उपस्थितीत तसेच निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ओंकार ओेतारी व सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी हेमंत किरूळकर यांच्यामार्फत…

0 Comments

अभिनवच्या दणक्याने 1440 वैद्यकीय अधिकारी भरती

अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्गतर्फे दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या दणक्याने शासनाने राज्यात 1440 वैद्यकीय अधिकारी (डॉक्टर) पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.                 निवडणूक आचारसंहितेपूर्वी ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. आरोग्य विभागाच्या वतीने सरकारी वकिलांनी ही जाहिरात न्यायालयात सादर केली आहे. एम.बी.बी. एस. आणि पदव्युत्तर…

0 Comments

नगर वाचनालयाच्या विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

नगर वाचनालय, वेंगुर्लातर्फे 9 नोव्हेंबर रोजी संस्थेच्या कै.केशवराव अंकुश कुबल रंगमंचावर श्रीकृष्ण स.सौदागर स्मृती पुरस्कृत वेंगुर्ला शहर व उभादांडा परिसरातील प्राथमिक शाळांसाठी वैयक्तिक व सामुहिक स्वरूपाची मराठी सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात  आली. त्याचा गटनिहाय निकाल पुढीलप्रमाणे- पहिली ते चौथी (वैयक्तिक गट-कविता गायन)-प्रथम-कृष्णा सुरेंद्र चव्हाण…

0 Comments
Close Menu