पर्यावरणदिनी कासवमित्रांचा सन्मान
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भाजपा किसान मोर्चा-सिधुदुर्गतर्फे कासव संवर्धनासाठी अतुलनीय योगदान देणा-या वायंगणी येथील सहा कासवमित्रांचा सन्मान करण्यात आला. यात सुहास तोरसकर, प्रकाश साळगांवकर, संतोष साळगांवकर, गौरेश खडपकर, चंद्रशेखर तोरसकर, प्रकाश सागवेकर या कासवमित्रांचा समावेश आहे. कासवमित्रांच्या परिश्रमांमुळे जैवविविधतेचे संरक्षण शक्य…
