अणसूर पाल हायस्कूलला फिट इंडिया मानांकन

राष्ट्रीय क्रीडा सप्ताहानिमित्त २६ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत अणसूर पाल हायस्कूलने विविध क्रीडा विषयक उपक्रम यशस्वीपणे आयोजित केले. त्याबद्दल क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार व फिटइंडिया यांच्यावतीने अणसूर पाल हायस्कूल अणसूर शाळेला फिट इंडिया मानांकनाचे सन्मानपत्र व फिट इंडिया फ्लॅग…

0 Comments

जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची बदली

 सिधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची तडकाफडकी  बदली झाली आहे. त्यांची महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ, पुणे येथे व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  तर सिधुदुर्गचे नवे जिल्हाधिकारी म्हणून हापकिन जीव औषध निर्माण महामंडळ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील यांची नियुक्ती शासनाने केली आहे. जिल्हाधिकारी…

0 Comments

सचिन पालव यांना ‘वेंगुर्ला संगीतभूषण‘ पुरस्कार

वडखोल येथील सचिन पालव हे संपूर्णपणे दृष्टीहिन असूनही त्यांनी आपल्या दिव्यांगावर मात करीत संगीत क्षेत्रातील तीन महत्त्वाच्या पदव्या संपादन केल्या आहेत. त्यांनी हार्मोनियम वादन, तबला वादन व गायनामध्येही संगीत विशारद पदवी प्राप्त केली आहे. कमी वयात मिळविलेले हे यश आदर्श निर्माण करणारे आहे.…

0 Comments

गायन स्पर्धेत सर्वेश राऊळ प्रथम

श्री रामेश्वर मंदिरात दीपक केसरकर मित्रमंडळ सावंतवाडी व शिवसेना वेंगुर्ला यांनी पुरस्कृत केलेल्या शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्था व रामेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्यातर्फे घेतलेल्या खुल्या शिवमहिमा गायन स्पर्धेचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम,…

0 Comments

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा शुभारंभ

राज्यातील सर्व धर्मियांमधील ६० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा करण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना‘ महाराष्ट्र शासनाकडून घोषित करण्यात आली आहे. वेंगुर्ला भाजपाच्यावतीने या योजनेचा शुभारंभ चांदेरकर विठ्ठल मंदिरात ह.भ.प.सावळाराम कुर्ले बुवा यांच्या उपस्थितीत मोफत फॉर्म वितरण करून करण्यात आला.…

0 Comments

बहुसंख्य युवकांचा सेनेत प्रवेश

वेंगुर्ला तालुक्यातील विविध भागातील युवकांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे यांच्या माध्यमातून शिवसेनेत प्रोश केला. यावेळी युवासेना तालुका सचिव म्हणून सागर गावडे, युवासेना शहर सचिव म्हणून उमेश आरोलकर, युवसेना शहर शाखाप्रमुख म्हणून…

0 Comments

गाडीअड्डा येथे चार थर रचत फोडली दहीहंडी

वेंगुर्ला-गाडीअड्डा येथे एकावर एक असे चार थर रचत गोविंदांनी दहीहंडी फोडली. ‘‘गोविंदा रे गोपाळा‘‘ च्या जयघोषात युवाईने जल्लोष केला. नागरिकांनीही येथे उपस्थित राहत गोविंदांना साथ दिली. वेंगुर्ला शहरासह तालुक्यात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वेंगुर्ला सातेरी व्यायाम शाळेतर्फेही दहीहंडी उत्सव साजरा…

0 Comments

वेंगुर्ला तालुकास्कूलमध्ये श्रीकृष्णाचे पूजन

दरवर्षीप्रमाणे गोकुळाष्टमीचे औचित्य साधून तालुकास्कूल वेंगुर्ला शाळा नं.१ येथे  मोठ्या उत्साहात श्रीकृष्णाचे पूजन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णावर आधारीत काही सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले. यावेळी शिक्षक व पालक उपस्थित होते. २७ ऑगस्ट रोजी साकव पुलावर श्रीकृष्णाचे विसर्जन करण्यात आले.

0 Comments

पुस्तकहंडीतून मुलांनी दिला ज्ञानाचा वसा

डिजिटल युगात प्रगतीचे बीज रूजत असताना सोशल मिडियाच्या माध्यमातून विघातक आणि वाईट गोष्टींच्या विळख्यात तरूणांसह लहान मुलेही अडकत आहेत. समाजाकडे मुलांना निकोप आणि प्रगल्भ समाजाभिमुख दृष्टीने पहायला शिकवण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन वेंगुर्ला येथील मुक्तांगणतर्फे मुलांमध्ये वाचनसंस्कार रूजावा या हेतूने पुस्तकहंडी हा उपक्रम गोकुळाष्टमीचे…

0 Comments

भास्करपंतांची शंभरावी पुण्यतिथी उत्साहात

वेंगुर्ला येथील प.पू.भास्कर पंत वागळे महाराज यांच्या १००व्या  पुण्यतिथी निमित्त शहरात पालखी दिंडी सोहळ्यासह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. २४ ऑगस्ट रोजी सकाळी जुना स्टॅण्ड येथील श्री देव गणपती मंदिर येथून पालखी दिडी सोहळ्याला प्रारंभ झाला. यावेळी ढोल पथक आणि लहान…

0 Comments
Close Menu