शिबिरात दीडशे जणांची नेत्र तपासणी

विश्व हिदू परिषदेच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने वेंगुर्ला-भटवाडी येथील रवी शिरसाट यांच्या निवासस्थानी २५ ऑगस्ट रोजी घेतलेल्या मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचा सुमारे दीडशे जणांनी लाभ घेतला. उद्घाटन नवी मुंबईचे सहाय्यक आयुक्त जयंत जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात मुंबईतील नेत्रतज्ज्ञ डॉ.निरव रायचुरा व…

0 Comments

      राधा,कृष्ण वेशभूषा स्पर्धेला प्रतिसाद

कृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून दीपकभाई केसरकर मित्रमंडळ सावंतवाडी पुरस्कृत श्रावण महोत्सवांतर्गत वेंगुर्ला-नगरवाचनालय येथे शिवसेना वेंगुर्ला व शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्था यांच्या विद्यमाने घेण्यात आलेल्या राधा, कृष्ण वेशभूषा स्पर्धेला चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात ४७ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. बालवाडी गटामध्ये प्रथम-सार्थक लांजेकर, द्वितीय-प्राप्ती मोरे,…

0 Comments

आसोली हायस्कूल, परबवाडा नं.१ प्रथम

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भाजपाच्यावतीने आयोजित केलेल्या समुहगीत गायन स्पर्धेचे उद्घाटन स्पर्धा पुरस्कर्ते भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते झाले. ही स्पर्धा १४ ऑगस्ट रोजी वेंगुर्ला हायस्कूल येथे घेण्यात आली. स्पर्धेतील माध्यमिक गटात प्रथम-आसोली हायस्कूल, द्वितीय-सातेरी हायस्कूल वेतोरे, तृतीय-रा.कृ.पाटकर हायस्कूल,…

0 Comments

जाणीव जागृती यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद

गेल्या १५ वर्षात सावंतवाडी मतदार संघातील नागरिकांवर अन्याय झाला आहे. हा अन्याय या भागाच्या विकासास निवडून दिलेल्यांकडून झालाय. आम्ही आपल्या गावी आपल्या वाडीवर, वस्तीवर, आपल्या हक्काचा जागर करण्यासाठी आपल्या शक्तीची जाणीव करून देण्यासाठी जाणीव जागरण यात्रेच्या निमित्ताने येत आहोत. या भागात आरोग्यसेवा, रोजगार…

0 Comments

‘लाडकी बहिण‘ योजनेबाबत राष्ट्रवादीकडून ऋण व्यक्त 

‘लाडकी बहिण‘ योजनेंतर्गत लाभार्थींना दोन महिन्यांचे एकूण तीन हजार प्राप्त झाले. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या सूचनेनुसार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व अदिती तटकरे यांचे सिंधुदुर्ग महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ऋण व्यक्त करून अजितदादा पवार यांना राख्या पाठविण्यात आल्या. यावेळी प्रज्ञा परब, प्रिया…

0 Comments

ओंकार ओतारी यांचा ‘उत्कृष्ट तहसीलदार‘ म्हणून सन्मान

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ओरोस येथे महसूल विभागाचा सन्मान सोहळा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सन २०२३-२४मध्ये महसूल विभागातील उप विभागस्तरावर उत्कृष्ट काम करणारे वेंगुर्ल्याचे तहसिलदार ओंकार ओतारी यांचा ‘उत्कृष्टतहसीलदार‘ म्हणून सन्मान करण्यात आला.    

0 Comments

न.प.मार्फत विविध ठिकाणी वृक्षारोपण

‘माझी वसुंधरा अभियान ५.०‘ व ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४‘ अंतर्गत वेंगुर्ला न.प.मार्फत मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी देशी प्रजातींच्या ५०० वृक्षांची लागवड करण्यात आली. निशाण तलाव परिसरामध्ये १०० बांबूच्या रोपांची, कॅम्प येथील नवीन म्हाडा वसाहत शेजारील मैदान, दाडाचे टेंब स्मशानभूमी, आनंदवाडी स्मशानभूमी,…

0 Comments

देशभक्तीपर गीतांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून वाहवा

वेंगुर्ला न.प.मार्फत ‘घरोघरी तिरंगा‘ अंतर्गत कालेलकर सभागृहात तिरंगा शपथ घेण्यात आली. त्यानंतर वेंगुर्ला हायस्कूल, सिधुदुर्ग विद्यानिकेतन, शिवाजी प्रागतिक शाळा, वेंगुर्ला नं.१, वेंगुर्ला नं.२ व वेंगुर्ला नं.४ या शाळांच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समुहगीत व समुहनृत्य सादर करीत उपस्थितांकडून वाहवा मिळविली.     भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची…

0 Comments

स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. नगरपरिषदेच्या क्रॉफर्ड मार्केटइमारतीवर मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ‘तिरंगा ट्रीब्युट‘ या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात आले.       नगरपरिषदेतर्फे घेतलेल्या भित्तीचित्र महोत्सवातील अक्षय जाधव (प्रथम), गोविद सावंत (द्वितीय), आदित्य गावडे (तृतीय), सिद्धेश प्रभू…

0 Comments

जनता दरबारात ११४७ तक्रार अर्ज

अनेक वर्ष प्रलंबित असलेले सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावावेत, यासाठी तिन दिवस घेण्यात आलेल्या जनता दरबारामध्ये तिन्ही मतदारसंघातील मिळून जिल्ह्यातून विक्रमी ११४७ तक्रार अर्ज प्राप्त झाले. त्यातील ६३१ तक्रारींचे निवारण करण्यात आले असून ५१६ तक्रारी शिल्लक राहिल्या आहेत. शिल्लक राहिलेल्या सर्वच तक्रारी सोडविण्यासाठी…

0 Comments
Close Menu