वेंगुल्र्यात मे. प्रशांत सव्र्हेज पुणे या संस्थेकडून करण्यात आलेल्या वेंगुर्ला सिटी सव्र्हेच्या कामाच्या पडताळणीचा शुभारंभ श्री तांबळेश्वर मंदिर येथे 27 जानेवारी रोजी ज्येष्ठ ग्रामस्थ भालचंद्र अंधारी यांच्या हस्ते झाला. यावेळी नगराध्यक्ष, भूमापन अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक, न.प. अधिक्षक संगिता कुबल, भूमी अभिलेखचे उपअधिक्षक व नागरिक उपस्थित होते.
तांबळेश्वर मंदिरच्या ठिकाणी सिटी सव्र्हेच्या कामाच्या पडताळणीबाबत माहिती व कामाचा शुभारंभ करण्यासाठी ज्या नागरिकांना नोटीसा पाठवून बोलावण्यात आले होते. त्या नागरिकांना नगराध्यक्ष गिरप यांनी सदर भूमापनाचे काम 2012 साली सुरु होऊन 2015 पर्यंत 90 टक्के पूर्ण झाले. परंतु सदर भूमापन हे प्रशांत सव्र्हे पुणे येथील खाजगी संस्थेमार्फत करण्यात आले. या कामास 56 लाख एवढा खर्च आला होता. त्यातील या संस्थेला एकही रुपया देण्यात आला नसल्याने या संस्थेने उर्वरित 10 टक्के काम अर्धवट सोडून दिले होते. हे निदर्शनास येताच आपण तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सदर कामाचा पाठपुरावा करुन ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन आपण स्वत: तसेच भूमी अभिलेख अधिकारी, मुख्याधिकारी अशी एकत्र बैठक घेऊन ऑक्टोबर 2019मध्ये या कामाचा निधी प्रशांत सव्र्हेज संस्थेला देण्यात आला. या संस्थेने उर्वरित 10 टक्के काम 2019 मध्ये पूर्ण केले. सदर कामाचा दुसरा टप्पा नगरभूमापन कामाची पडताळणी करणे हा असून त्यानुसार केलेल्या नगरभूमापन कामाचा शुभारंभ होत असून या पडताळणी कामास नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.