► कचरा मुक्तिमध्ये वेंगुर्ला शहराला थ्री स्टार मानांकन

                                          वेंगुर्ला शहराने स्वच्छतेमधील आपला अग्रकम कायम ठेवत कचरा मुक्त शहराचे थ्री स्टार‘ मानांकन कायम राखण्यामध्ये यश मिळविले आहे.

   केंद्रसरकारने सन २०१९-२० या सालाकरीता घेतलेल्या कचरामुक्त शहराच्या स्टार मानांकनासाठी जानेवारी २०२० मध्ये फेर तपासणी करण्यात आली. यामध्ये वेंगुर्ला शहराला त्यावर्षी मिळालेला स्टार मानांकनाचा दर्जा कायम राखला आहे की नाही याचे त्रयस्थ यंत्रणेमार्फत परिक्षण करण्यात आले होते. सदर परिक्षणामध्ये सर्व मानांकनामध्ये किबहूना राज्यातील नगरपरिषदांमध्ये सर्वाधिक गुण मिळवून वेंगुर्ला शहर पुन्हा एकदा थ्री स्टार‘ शहर म्हणून केंद्रीय नगरविकासमंत्री हरदीपसिग पुर यांनी आज मंगळवारी दिल्ली येथे घोषणा केली.

      आपल्या कोकण विभागात कचरा मुक्त शहर थ्री स्टार मानांकनासाठी  एकूण ६ जणांनी बाजी मारली. या सहामध्ये अंबरनाथखेडमाथेरानराजापूररत्नागिरी व वेंगुर्ला यांचा समावेश असून या सहामध्येही सर्वाधिक गुण वेंगुर्ला नगरपरिषदेला प्राप्त झालेले आहेत.

      कचरामुक्त शहराचे थ्री स्टार मानांकन जे वेंगुर्ला नगरपरिषदेस प्राप्त झालेले आहे. त्यासाठी नगरपरिषदेचे सर्व पदाधिकारीप्रशासनाचे अधिकारीकर्मचारी व शहरातील सर्व नागरीक यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे व सुजाण नागरीकांच्या भक्कम पाठींब्यामुळे अजून एक मानाचा तुरा नगरपरिषदेच्या शिरपेचात रोवला गेला आहे. यापुढेही जाऊन ५ स्टार मानांकन मिळविण्यासाठी आपल्या पूर्ण टीमचे प्रयत्न राहतील असे मत नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी व्यक्त करीत यासाठी सहकार्य करणा-या सर्वांचे आभार मानून अभिनंदन केले आहे.

      कचरामुक्त शहराचे थ्रीस्टार मानांकन वेंगुर्ला नगरास मिळावे यादृष्टीने नगरपरिषदेमधील सर्व स्वच्छता कर्मचारीस्वच्छता निरीक्षकस्वच्छता अभियंता व स्वच्छता शहर समन्वयक यांनी तांत्रिक बाबी त्याचबरोबर प्रत्यक्ष शहरातील स्वच्छता यावर अथक मेहनत घेतल्याचे व त्यास वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सर्व कर्मचा-यांनी व नागरीकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने हे श्रेय त्यांचे आहे. या स्वच्छतेच्या माध्यमातून शहराचा सर्वांगिण विकास व सुंदरतेकडे प्रशासन लक्ष देईल असे मत मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी व्यक्त केले.

This Post Has One Comment

  1. वाचून च खुप छान वाटले

Leave a Reply to अजय शंकर मराठे Cancel reply

Close Menu