इ-पासच्या नावाखाली एजंटगिरीविरोधात होणार कारवाई – पालकमंत्री सामंत

 मुंबईतून येणारे काही चाकरमानी रितसर पास न घेता ऑनलाईन पासचा टोकन नंबर घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्रात प्रवेश करीत असल्याचे खारेपाटण चेकपोस्ट निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशाप्रकारे पास शिवाय जिल्ह्रात येणा-या व्यक्तींना जिल्ह्रात प्रवेश दिला जाणार नसून त्यांना परत पाठविण्यात येईल अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी वेंगुर्ला येथे दिली. तर सिंधुदुर्ग जिल्ह्रात पासच्या नावाखाली एजंटगिरी आढळून आल्यास अशा एजंटवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. दरम्यान, कोरोनाच्या काळात मागील काही दिवसांत सरपंच यांच्या सूचनांना वेंगुल्र्यातील प्रशासन योग्य सहकार्य करत नसल्याच्या तक्रारीमुळे पालकमंत्री यांनी बैठकीत प्रशासनाला धारेवर धरले व यापुढे तुम्हाला जमत नसेल तर मी करेन अशी तंबीही दिली.

वेंगुर्ला येथील तहसिलदार कार्यालयात आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत तालुका सरपंच संघटनेची बैठक पार पडली. यावेळी पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसिलदार प्रविण लोकरे, मुख्याधिकारी वैभव साबळे, गटविकास अधिकारी उमा पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी अश्विनी माईणकर, युवा नेते संदेश पारकर, शिवसेना तालुका प्रमुख यशवंत परब, उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, सचिन वालावलकर, शिवसेना शहरप्रमुख अजित राऊळ, सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई, तालुकाध्यक्ष पपू परब यांच्यासह तालुक्यातील सरपंच उपस्थित होते.
या बैठकीत मुंबईवरुन खाजगी गाडीने आलेल्या चाकरमान्यांचे संस्थात्मक किंवा गृह विलगीकरण झाल्यानंतर त्या गाडीचा पास कृती समितीने आपल्या ताब्यात घ्यावा. जेणेकरुन ती गाडी जिल्ह्रात इतरत्र कुठेही फिरणार नाही अशी माहिती प्रांताधिकारी खांडेकर यांनी दिली.
मुंबई व परराज्यातून सुमारे 27 ते 28 हजार चाकरमानी सिंधुदुर्ग व रत्नागिरीत दाखल झाले आहेत. त्यांना आवश्यकतेनुसार संस्थात्मक व गृह विलगीकरण केले आहे. रेड झोनमधून आलेल्यांची स्वॅब तपासणीही करण्यात येणार आहे. सरपंचांच्या मागणीनुसार तलाठी यांना दोन दोन गावे दिली आहेत. शिक्षकांना 12 तास ड¬ुटी केली आहे. तसेच जे शिक्षक गैरहजर आहेत त्यांना हजर राहण्याची सूचना देण्यात आल्या आहेत.
सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्रातील सर्व सरपंच कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर फिल्डवर काम करीत आहेत. त्यांच्या भविष्याची काळजी घेऊन आपण स्वत: दोन प्रकारात सरपंचांसाठी वीमा कवच आताच जाहीर करीत आहे. याबाबत मी विमा कंपनीशी चर्चाही केली आहे. वर्षभरात दुर्देवाने सरपंचांच्या बाबतीत हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यास अडीच लाखांचा विमा संरक्षण देण्यात येईल. यापुढे याच विम्याचे अपघाती विम्यात रुपांतर होऊन 5 लाख पर्यंतचे विमा संरक्षण देण्यात येईल. येत्या दोन ते चार दिवसात प्रत्येक ठिकाणचे गटविकास अधिकारी यांनी आपापल्या तालुक्यातील सरपंचांचे अर्ज भरुन घ्यावेत अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या. त्याचप्रमाणे कोरोना संदर्भात एखाद्या सरपंचांचे संभाषण सोशल मिडियावर व्हायरल करुन त्याबाबत आक्षेप घेण्याचे प्रकार होत असतील व यामुळे प्रशासनाची बदनामी होत असेल तर अशांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही पालकमंत्री यांनी सांगितले.
बैठकीत वायंगणी सरपंच सुमन कामत यांनी प्रशासन जाणून बुजून आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असून ग्रामपंचायतीला कोणत्याही सूचना न देता आपला मनमानी कारभार करीत आहेत. याबाबत पालकमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली. एखादा व्यक्ती कर्नाटकवरुन येतो, गावात रहातो, प्रशासन त्याला रेशनकार्ड देते आणि हिच व्यक्ती कोरोना काळात रेडझोन मधून पुन्हा गावात येतो. ग्रामपंचायतमार्फत प्रशासनाला वेळोवेळी सूचना दिल्यावरही त्याच्यावर कोणतीही कार्यवाही होत नाही व हिच व्यक्ती कोरोना पॉझीटीव्ह निघतो. याबाबत सरपंचांना आपल्याकडे लेखी तक्रार करण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे कंन्टेंमेंट झोन उठविण्याच्या अगोदर चार दिवस अचानकपणे ग्रामपंचायतीला कोणतीही लेखी सूचना न देता वायंगणी गावात रेडझोनमधून आलेल्या चाकरमान्यांना गावात पाठविण्याचे नियोजन घेतले जाते. या सर्व प्रकाराची एका वरिष्ठ अधिका-यांमार्फत चौकशी होऊन याची खात्री करण्यात येईल व यात दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे पालकमंत्री यांनी सांगितले.
जिल्ह्रातील परमिट रुम व बार चालकांनी आपल्याकडे असलेला स्टॉक संपविण्यासाठी होमडिलिव्हरी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आपण काल रात्री दिलीप वळसे-पाटील यांच्याशी चर्चा झाली असून ज्या परमिट रुम व बार चालकांकडे स्टॉक आहे त्यांनी तो नियमांच्या अधिन राहून होमडिलिव्हरी किंवा टेकअवे पद्धतीने त्याची विक्री करावी असे महाराष्ट्र शासनाचे आदेश झाल्याचे पालकमंत्री सामंत यांनी माहिती दिली.

Leave a Reply

Close Menu