►शिरोडा-वेंगुर्ला-विरार बस सुरु

परिवहन महामंडळ (एसटी) वेंगुर्ला आगाराने प्रवाशांच्या सेवेसाठी शिरोडा-विरार ही नविन बससेवा सुरु केली आहे. सदरची बससेवा ही शिरोडा, वेंगुर्ला, मठ, कुडाळ, कणकवली, राजापूर, पाली, हातखंबा, चिपळूण, पेण, पनवेल, ठाणे, भांडूप, बोरीवली मार्गे विरारला जाणार आहे. शिरोडा येथून संध्याकाळी ३.३० वाजता सुटून  विरार येथे सकाळी ७.०० वाजता पोहचेल. तर परतीच्या प्रवासासाठी विरार येथून संध्याकाळी ३.३० वाजता सुटून शिरोडा येथे सकाळी ७ वाजता पोहचेल. तरी प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन वेंगुर्ला आगाराचे प्रभारी स्थानक प्रमुख निलेश वारंग यांनी केले आहे. अधिक माहीतीसाठी वेंगुर्ला स्टँड ०२३६६- २६२०३८ किवा वेंगुर्ला आगार २६२१७८ यांच्याशी संफ साधावा.

This Post Has One Comment

  1. Very good news.All the very best.

Leave a Reply to Adv Supriya Desai Cancel reply

Close Menu