उन्नत्ती केरकर पैठणीच्या मानकरी

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजपा महिला मोर्चा वेंगुर्ल्याच्यावतीने आयोजित केलेल्या होममिनीस्टर – खेळ पैठणीचाया स्पर्धेत उन्नत्ती केरकर या पैठणीच्या मानकरी ठरल्या. ही पैठणी पॉप्युलर क्लॉथ स्टोअर्सचे अमर दाभोलकर यांनी पुरस्कृत केली होती.

    ८ मार्च रोजी साई मंगल कार्यालयात झालेल्या या स्पर्धेत ६५ महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. उद्घाटन कृतिशील शिक्षिका प्राजक्ता आपटे यांच्या हस्ते झाले. पूर्वीच्या पिढीतील स्त्रियांनी स्वातंत्र्याची दालनं खुली करून दिली. प्रत्येक पिढीगणिक ती विस्तारत गेली. आपणही या मिळालेल्या हक्कांचा स्वातंत्र्याचा योग्य तो उपयोग करून आपल्या पुढच्या पिढीमध्ये उत्तम संस्कार होण्यासाठी योग्य नीती मूल्यांची रुजवण करून उत्तम समाज घडविण्यासाठी प्रयत्न करुया असे आवाहन सौ.आपटे यांनी केले.

      यावेळी व्यासपिठावर इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा ज्योती देसाई, लिनेस क्लबच्या अध्यक्षा उर्मिला सावंत, निला यरनाळकर, आश्विनी गावसकर, कविता भाटीया, प्राची मणचेकर, बिना भाटीया, हेमा गावसकर व अंजली धुरी, भाजपाच्या स्मिता दामले, प्रार्थना हळदणकर, अॅड. सुषमा प्रभूखानोलकर, सारिका काळसेकर, शितल आंगचेकर, श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर, कृपा मोंडकर, पुनम जाधव, वृंदा गवंडळकर, डॉ.पुजा कर्पे, खानोली सरपंच प्रणाली खानोलकर, अक्षया गिरप, वृंदा मोर्डेकर, रसिका मठकर, आकांक्षा परब, लक्ष्मी परब, गौरी मराठे, किर्तीमंगल भगत, हसीना बेन मकानदार आदी उपस्थित होते.

     खेळ पैठणीचा स्पर्धेत द्वितीय-दिव्या पवार (वक्रतुंड ज्वेलर्सचे भाऊ मालवणकर पुरस्कृत सोन्याची नथ), तृतीय-निकिता जोशी (दुर्वांकूर ज्वेलर्सचे शैलेश तुळसुलकर पुरस्कृत चांदीचे निरंजन), चतुर्थ-अस्मिता गिरप (महेंद्र क्लॉथ स्टोअर्सचे मिलिद पिजाणी पुरस्कृत साडी), पाचवा-प्रज्ञा पेडणेकर (काजू व्यापारी अविनाश गिरप पुरस्कृत साडी), उत्तेजनार्थ-निलम कामत (महेंद्र वस्तू भांडारचे नरेश गावडे पुरस्कृत गृहपयोगी वस्तू), मुग्धा वैद्य (कॉनबॅकचे मोहन होडावडेकर पुरस्कृत कीस्टॅण्ड) यांनी नंबर पटकाविले.

        स्पर्धेचे सुत्रसंचालन अनिता कराओकेचे कलाकार अनिता आरोंदेकर, शैलेश जामदार व अभय आरोंदेकर यांनी खुमासदार करून कार्यक्रमात रंगत आणली. स्पर्धेचे परीक्षण चव्हाण यांनी केले.

Leave a Reply

Close Menu