वेतोरे येथील ज्ञानदा शिशूवाटिकेत झाडाला राखी बांधून रक्षाबंधन साजरी करण्यात आली. मुलांना वृक्ष संवर्धनाची गरज लक्षात यावी यासाठी रक्षाबंधन साजरे करताना संचालिका कांचन दामले यांनी मुलांकडून राखी बनवून घेत ती वडाच्या झाडाला बांधून त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी मुलांवर सोपविली.
डब्याच्या वेळी काऊ चिऊला घास घालणे, परिसरातील झाडांना पाणी घालणे, वाढदिवसाच्या दिवशी मुलांकडून झाड लावून घेणे असे निसर्गा विषयी प्रेम वाढवणारे संस्कारक्षम उपक्रम शिशुवाटिकेत राबविले जातात.