नगरपरिषदेतर्फे स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाईकांचा सत्कार

      स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे शहरातील स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाईकांचा 15 ऑगस्ट रोजी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

      नगरपरिषदेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. देश स्वातंत्र्य होण्यासाठी ज्या ज्या लोकांनी आपले योगदन दिले होते, त्यांच्या नातेवाईकांची भेट घेणे, चर्चा करणे या कार्यक्रमाअंतर्गत स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाईकांचा सत्कार करण्यात आला. यात अनिल सौदागर यांचा माजी नगरसेवक शितल आंगचेकर यांच्या हस्ते, विजय गुरव यांचा माजी नगरसेवक सुहास गवंडळकर यांच्या हस्ते,  जनार्दन तोरस्कर यांचा माजी नगरसेवक पुनम जाधव यांच्या हस्ते तर विलास पडवळ यांचा माजी नगरसेवक श्रेया मयेकर व साक्षी पेडणेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडलेल्या या सत्कार सोहळ्याप्रसंगी मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे, कार्यालयीन अधिक्षक संगीता कुबल यांच्यासह नगरपरिषदेचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. सत्कारमूर्तींमधून अनिल सौदागर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Leave a Reply

Close Menu