निशाण तलाव येथे प्रथमच फडकविला झेंडा

जलस्वराज्य अभियानांतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेच्या निशाण तलाव येथे 15 ऑगस्ट रोजी यावर्षी प्रथमच झेंडावंदन करण्यात आले. हे झेंडावंदन स्वातंत्र्यसैनिकांचे नातेवाईक विजय गुरव यांच्या हस्ते झाले. मृद व जलसंधारण विभाग, रत्नागिरी कार्यालयाकडून जलस्वराज्य अभियानांतर्गत ज्या नगरपरिषदांचे पाणी पुरवठा करणारे स्वत:चे तलाव आहे, अशा ठिकाणी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त स्वातंत्र्यसैनिकांकडून अथवा त्यांच्या नातेवाईकांकडून झेंडावंदन करण्यात यावे अशा आदेशानुसार वेंगुर्ला नगरपरिषदेचा निशाण तलाव येथे झेंडावंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला. निशाण तलाव येथे प्रथमच झेंडावंदन करण्याचा पहिला मान वेंगुर्ला शहरातील स्वातंत्र्यसैनिक तसेच श्री रामेश्वर देवस्थानचे पूर्वीचे व्यवस्थापक गणेश उर्फ काका गुरव यांचा मुलगा विजय गुरव यांना मिळाला. यावेळी मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे, कार्यालयीन अधिक्षक संगीता कुबल यांच्यासह नगरपरिषदेचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu