परितोष कंकाळ न.प.चे नवे मुख्याधिकारी

वेंगुर्ला नगरपरिषदेमध्ये तीन वर्ष सेवा बजावल्याने डॉ. अमितकुमार सोंडगे यांची प्रशासकीय बदली झाली आहे. विद्यमान नगरपरिषदेतील नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा पाच वर्षांचा कालावधी संपल्यामुळे सध्या प्रशासकीय कारभार सुरू आहे. दरम्यान सोंडगे यांच्या जागी परितोष कंकाळ यांची नियुक्ती झाली आहे. श्री.कंकाळ हे सध्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड नगरपंचायतीमध्ये मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. वेंगुर्ला येथे त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर कार्यालयाच्यावतीने कार्यालयीन अधिक्षक संगीता कुबल, सर्व अधिकारी व कर्मचा-­यांनी त्यांचे स्वागत केले.

 

Leave a Reply

Close Menu