वेंगुर्ला येथे हिदू हितचितक अभियानाचा शुभारंभ

संपूर्ण देशभर विश्व हिदू परिषदेने ६ ते २० नोव्हेंबर या कालावधीत हिदू हितचितक अभियानआयोजित केले आहे. वेंगुर्ल्यामध्येही या अभियानाचा शुभारंभ १० नोव्हेंबर रोजी येथील चांदेरकर विठ्ठल मंदिरात ह.भ.प.सावळाराम कुर्ले बुवांच्या हस्ते करण्यात आला. विश्व हिदू परिषदेचे जिल्ह्याचे सामाजिक समरसतेचे प्रमुख विष्णू खोबरेकर यांनी हितचिंतक अभियानाची माहिती दिली. तसेच सर्व हिदूंनी एकत्रित येण्याची गरज असल्याचे सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आत्माराम बागलकर यांनी हिंदुंनी आपल्या धर्माच्या रक्षणासाठी विश्व हिदू परिषदेच्या चळवळीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. दरम्यान, सावळाराम कुर्ले बुवांचा पंढरपुरची अखंड वारी करीत असल्या बद्दल त्यांचा रामेश्वर देवस्थान ट्रस्टचे सचिव रविद्र परब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विश्व हिदू परिषदेचे वेंगुर्ला प्रखंड प्रमुख अरुण गोगटे, प्रखंड मंत्री आप्पा धोंड, रा.स्व.संघाचे तालुका संघचालक बाबुराव खवणेकर, कार्यवाह मंदार बागलकर, बजरंग दलाचे भुषण पेठे, भाजपचे शरद चव्हाण, प्रसन्ना देसाई, विश्व हिदू परिषदेचे महादेव केरकर, भाजप महीला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर व वृंदा मोर्डेकर, राष्ट्रीय सेवक संघाचे विजय वाडकर, हिंदुधर्माभिमानी  स्मिता मांजरेकर, मृण्मयी केरकर, प्रिती चव्हाण, शालीनी चिपकर, स्वप्नाली धोंड, ओंकार चव्हाण, वारकरी सांप्रदायचे किशोर रेवणकर, गजानन कुबल, दिगंबर कुबल, रघुवीर पेडणेकर, रमाबाई तांडेल, शारदा तांडेल, प्रमिला टांककर, सहदेव गिरप, दिपाली कुबल, चित्रा केरकर, देवयानी केरकर, दाजी सावंत, सहदेव गिरप, सुजाता भुते, सावित्री तारी, अश्विनी गिरप, सुगंधा बांदेकर, चंदन कुर्ले, पांडुरंग मोंडकर, शामसुंदर रेवणकर, विठ्ठल वेंगुर्लेकर, अपर्णा सातार्डेकर, चंद्रभागा मेस्त्री, संध्या भोगवेकर, शाम आरोलकर, अंकुश वराडकर, दुर्गा कुबल, लक्ष्मी तांडेल, बाबली राऊळ, शुभांगी केळुसकर आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Close Menu