आरती कार्लेकर स्वेच्छानिवृत्त

  बँक ऑफ इंडियाच्या वेंगुर्ला शाखेमधील व्यवस्थापकीय अधिकारी श्रीमती आरती संजय कार्लेकर यांनी ३७ वर्षांच्या सेवेनंतर स्वेच्छा निवृत्ती घेतली. यानिमित्त ३१ जानेवारी रोजी रत्नागिरी झोनल मॅनेजर संतोष सावंत-देसाई, ऑफिसर असोसिएशनचे ऋषिकेश गावडे, माजी वरिष्ठ प्रबंधक नंदकुमार प्रभूदेसाई आणि श्री.केरकर, तसेच वेंगुर्ला शाखेचे वरिष्ठ प्रबंधक विजय वर्मा यांच्या हस्ते कार्लेकर यांचा सन्मान करण्यात आला.

             कार्लेकर यांनी दोन वर्षात सुमारे दीड कोटींचे प्रिमियम बँकेला मिळवून दिल्याबद्दल स्टार युनियन लाईफ इन्शुरन्सतर्फे त्यांचा विशेष गौरव केला. कार्लेकर यांनी बँक ऑफ इंडियाच्या सावंतवाडी, बांदा, तळवडा, कुडाळ आणि वेंगुर्ला शाखांमधून उत्कृष्ट काम केले आहे. बँकेतील कर्ज वसुली, डिपॉझिट मोव्हिलायझेशन व २००९ नंतर इन्शुरन्समध्ये भरपूर काम करून सर्व टार्गेट सातत्याने पूर्ण करण्याचा मान आरती कार्लेकर यांना मिळाला आहे. २००६ मध्ये बँक ऑफ इंडियाला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तेव्हा विशेष बँक कर्मचारी म्हणूनही त्यांचा सत्कार झाला होता. १० ते ६ ही आपली नोकरीची वेळ संभाळून सर्व टार्गेट पूर्ण करून त्यांनी प्रचंड सामाजिक कार्यही केले आहे.

    सत्कार समारंभावेळी वेंगुर्ला शाखेतील अधिकारी आलोक, अविनाश तसेच बँक कर्मचारी गौरव, गौरेश, अश्विनी, सद्गुरु परब, इन्शुरन्सचे इफगार पटेल यांनी मनोगत व्यक्त केले. रमाकांत पडवळ यांना ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल  तसेच मंदाकिनी सामंत यांना महिला उद्योजिका पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही बँकेतर्फे सन्मान करण्यात आला. माजी कर्मचारी सतिश डुबळे, ग्राहक दिलीप सामंत, सीमा मराठे, कुटुंबियांतर्फे स्नुषा सौ. अपर्णा मंगेश कार्लेकर व मुलगी सौ. मानसी हर्षद दीक्षित यांनी मनोगत व्यक्त केले.

Leave a Reply

Close Menu