इंग्रजी शिकविण्याचे उपक्रम राबवा-पुष्कराज कोले

सुमारे ११० वर्षांची परंपरा असलेल्या रा.कृ.पाटकर हायस्कूल व रा.सी.रेगे कनिष्ठ महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन तसेच पारितोषिक वितरण कार्यक्रम ३ फेब्रुवारी रोजी संपन्न झाले. यावेळी उद्योजक पुष्कराज कोले, बॅ.नाथ पै बी.एड महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य डॉ.प्रा.दिपाली काजरेकर-सावंत, पं.स.चे माजी सभापती जयप्रकाश चमणकर, शा.व्य.समितीचे अध्यक्ष सदानंद शारबिद्रे, पालक-शिक्षक संघ उपाध्यक्ष स्वाती गिरप, मुख्याध्यापक आत्माराम सोकटे, प्रा.महेश बोवलेकर उपस्थित होते.

      मराठी माध्यमाच्या शाळांमधून शिकून विविध क्षेत्रात अतुलनिय कामगिरी करणा­यांची अनेक उदाहरणे आहेत. तरीही मराठी शाळांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकविण्याचे उपक्रम राबविल्यास मराठी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा ओढा नक्की वाढेल, असे प्रतिपादन पुष्कराज कोले यांनी केले. माजी प्राचार्य डॉ.प्रा.दिपाली काजरेकर-सावंत यांनी महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील आदी शिक्षण सुधारकांच्या योगदनामुळे तळागाळातील लोकांना आज शिक्षणाची द्वारे खुली झाली आहेत असे सांगत विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे सामर्थ्य वेळीच ओळखण्याचे आवाहनही त्यांनी केले.

      मुख्याध्यापक आत्माराम सोकटे यांनी प्रास्ताविक तर शिक्षिका उज्जयनी मांजरेकर यांनी शाळेच्या प्रगतीचा वार्षिक अहवाल सादर केला. त्यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील प्रथम तीन क्रमांक मिळविणा­या सर्व विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. दिपाली काजरेकर-सावंत यांनी आपली बहिण माजी मुख्याध्यापिका यशवंती विश्राम सावंत यांच्या स्मरणार्थ रोख पारितोषिक दिले. देणगीदारांनी ठेवलेल्या ठेवींतून सहा होतकरु विद्यार्थ्यांना रक्कम प्रदान करण्यात आली. तर पुष्कराज कोले यांनीही विद्यार्थ्यांना रोख रक्कमेची उत्तेजनपर पारितोषिके दिली.

      विज्ञान प्रदर्शनातील प्रश्नमंजूषा प्रकारात प्रथम क्रमांक मिळविणा-­या व पुढे जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणा­-या साईराज बागुल व प्रथमेश जोशी यांना स्मृतिचिन्ह देऊन विशेष सन्मान तसेच सेवानिवृत्त झाल्यानंतर शाळेत येऊन विद्यार्थ्यांना शिकविणारे तुषार कामत व शामसुंदर येरम यांचा सहकुटुंब सन्मान करण्यात आला. विद्यालयाच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय जबाबदारी पार पडणारे प्रा.महेश बोवलेकर व विज्ञान शिक्षिका सविता जाधव यांनाही पुष्कराज कोले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा.महेश बोवलेकर तर आभार प्रा.विलास गोसावी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक, पालक, कर्मचारी, विद्यार्थी, हितचितक व ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले. सायंकाळी विविध गुणदर्शन कार्यक्रम पार पडले.

Leave a Reply

Close Menu