फलकातून दर्शविली वेंगुर्ल्याची जैवविविधता

जागतिक पाणथळ दिनानिमित्त कांदळवन प्रतिष्ठान, कांदळवन कक्ष मालवण, वेंगुर्ला न.प., बॅ.खर्डेकर महाविद्यालय व रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यामाने आणि कांदळवन कक्षाच्या दुर्गा ठिगळे, प्रा.डॉ.धनश्री पाटील यांच्या संकल्पनेतून २ फेब्रुवारी रोजी पाणथळ जागांचा जिर्णोद्धार कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वनपाल सावळा कांबळे, वनरक्षक श्री.सावंत, कांदळवन कक्षाचे जागृती गवंडे, अमित रोकडे, दिगंबर तोरसकर, शुभम कांबळे, निरज कोरगावकर तसेच न.प.च्या प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल, पुर्वा मसुरकर, संजय जोशी, रोटरॅक्टचे अध्यक्ष प्रितीश लाड, क्लबचे सदस्य, इं.मि.स्कूलचे शिक्षक पल्लवी भोगटे, अनिकेत वेंगुर्लेकर, रा.स.यो.चे कार्यक्रम अधिकारी, पर्यवेक्षक व  प्राध्यापक उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर वेंगुर्ल्याची जैवविविधता दर्शविणा-­या फलकाचे अनावरण कुडाळ वनक्षेत्रपाल अमृत शिदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूल व खर्डेकर महाविद्यालयाच्या एन.एस.एस. तसेच एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांच्या सहभागाने निसर्ग फेरीही काढण्यात आली. डॉ.सौरभ जोशी यांनी ‘शाश्वत पाणथळी‘ यावर माहिती दिली. डॉ. जोशी यांचा प्राचार्य डॉ. विलास देऊलकर  यांच्या हस्ते ‘वेटलँड वॉरियर‘चे सन्मानपत्र व टेरारियम देऊन सन्मान करण्यात आला. ‘समृद्ध जैवविविधता व शाश्वत विकास‘ अंतर्गत ठिकठिकाणी वेंगुर्ल्याची जैवविविधता दर्शविणारे फलक लावण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी कंकाळ यांनी दिली. सूत्रसंचालन चैतन्या लाड व रुपाली दाभोलकर यांनी केले.

Leave a Reply

Close Menu