प्रयोगशाळेतून नवीन नाटक जन्माला येईल

  कुडाळ हायस्कूलच्या आवारात क.म.शि.प्र.मंडळाने उभारलेल्या चि.त्र्यं.खानोलकर ललित कला केंद्र व वसंत देसाई मुक्तावकाश रंगमंचाचे उद्घाटन प्रसिद्ध नाटककार शफाअत खान यांच्या हस्ते झाले. यावेळी चि.त्र्यं.खानोलकर यांच्या कन्या हेमांगी नेरकर, दिप्ती कळसुलकर, क.म. शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष हनुमंत सावंत, दिग्दर्शक चंदू शिरसाट, रंगभूषाकार विलास कुडाळकर, कुडाळेश्वर मित्रमंडळाचे अध्यक्ष किशोर काणेकर, चित्रकार विजय पडते, बाबा वर्दम थिएटर्सच्या अध्यक्षा वर्षा वैद्य, ज्येष्ठ नाट्य कलावंत भाऊ शिरसाट, वसंत देसाई व अन्य उपस्थित होते.

    तरूण मंडळी नाटकाकडे वळण्यासाठी कुडाळमध्ये उभ्या राहिलेल्या चि.त्र्यं.खानोलकर ललित केंद्रासारखी ललित केंद्रे उभी राहिली पाहिजेत. कुडाळ शहरात नाटकांची प्रयोगशाळा सुरू झाली आहे. त्यामुळे नवीन काहीतरी करून बघा. यातून नवीन नाटक जन्माला येईल, असा विश्वास ज्येष्ठ नाटककार शफाअत खान यांनी व्यक्त केला. चि.त्र्यं.खानोलकर हे कोकणवासियांच्या प्रेमाचे भुकलेले होते. हे सारे पाहून त्यांचा आत्मा प्रसन्न झाला असेल. आज कुडाळवासियांनी त्यांना अमरत्व प्राप्त करून दिले, अशा शब्दांत हेमांगी नेरकर यांनी कुडाळवासियांचे ऋण व्यक्त केले.

Leave a Reply

Close Menu