आडेली हायस्कूलचे पारितोषिक वितरण संपन्न

आडेली येथील कृषीरत्न काकासाहेब चमणकर हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम शि. प्र. समिती वेतोरे उपाध्यक्ष नंदकिशोर पुनाळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी प्रभाकर नाईक, स्मिता शेणई, सुरेश धुरी, चंद्रकांत गडेकर, जयवंत धर्णे, मुख्याध्यापक देवानंद चव्हाण यांच्यासह शिक्षक, पालक, शिक्षणप्रेमी, हितचितक उपस्थित होते. दहावी परीक्षेतील प्रथम तीन क्रमांक प्राप्त, चित्रकला व निबंध स्पर्धेतील विजेते, विज्ञान प्रदर्शनामधील प्रश्नमंजूषा स्पर्धेतील विजेते तसेच वार्षिक क्रीडा महोत्सवातील यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. तर उद्यजक अभिजित महाजन, आडेली सरपंच यशस्वी कोंडसकर, वजराट सरपंच अनन्या पुराणिक, रत्नागिरी बोर्ड विज्ञान विषयाचे मुख्य नियामक म्हणून निवड झालेले शिक्षक संतोष पवार यांचा सत्कार करण्यात आला.

                        

Leave a Reply

Close Menu