महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी 1960 साली स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिक वारसा फार मोठा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही योगदान दिले आहे. महाराष्ट्राचा धार्मिक तसेच सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी असल्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे म्हणाले.

      महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त सिंधुदुर्ग नगरी येथील पोलिस परेड मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात जिल्हावासियांना शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, पेालिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, अपर जिल्हाधिकारी रवी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती, उप जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, उपजिल्हाधिकारी शारदा पोवार, आरती देसाई, तहसिलदार प्रज्ञा काकडे,  जिल्हा नियोजन अधिकारी श्री. बुधावले, उप जिल्हा नियोजन अधिकारी श्री. पवार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu