रामघाट कला क्रिडा मंडळामुळे स्थानिक महिला, पुरुष आणि मुलांना हक्काचे व्यासपिठ मिळाले आहे. सर्वांनाच यश मिळते असे नाही. तर अपयशातून यश मिळत असल्याने मिळत असलेल्या संधीचे सोने येथील विद्यार्थी करीत आहेत. अशा क्रीडाप्रकारात सहभागी होऊन राज्यस्तरीय स्पर्धांमध्य यशस्वी कामगिरी करीत असल्याचे प्रतिपादन वेंगुर्ला नगरपरिषदेच्या माजी उपनगराध्यक्ष शितल आंगचेकर यांनी उद्घाटनप्रसंगी केले.
वेंगुर्ला-रामघाट येथील रामघाट कला क्रिडा मंडळाच्या तीन दिवस चालणा-या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन ८ फेब्रुवारी रोजी माजी उपनगराध्यक्ष शितल आंगचेकर हिच्या हस्ते झाले. यावेळी रामघाट कला क्रिडा मंडळाचे अध्यक्ष केदार आंगचेकर, डॉ.आनंद बांदेकर, जेष्ठ नागरिक प्रभाकर जबडे, शशिकांत साळगांवकर, सुदेश आंगचेकर, नामदेव सरमळकर, प्रार्थना हळदणकर, दीपा पेडणेकर, वैष्णवी वायंगणकर, हेमंत गावडे, जयेश परब, बाळू धुरी, जॉन डिसोजा, रामघाट कला क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते व रामघाटमधील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
रामघाट कला क्रीडा मंडळ म्हणजे एकजुटीचे साधन आहे. यावर्षी महिला पाककला स्पर्धा, व्हॉलीबॉल स्पर्धा, फनी गेम्स, रस्सीखेच स्पर्धा त्याचबरोबर १० फेब्रुवारी रोजी बक्षीस वितरण समारंभ व कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे ट्रीकसिनयुक्त नाटक होणार असल्याची माहिती डॉ.आनंद बांदेकर यांनी दिली.