मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना सुपारी रोपांचे वाटप

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या संकल्पनेतून एक विद्यार्थी-एक झाडअसा उपक्रम राबविण्याच्या निर्णय घेतला. त्यानुसार वेंगुर्ल्यातील सर्व जि.प.च्या प्राथमिक शाळांमधून प्रत्येक विद्यार्थी तसेच शिक्षकांना एकूण ६९७ सुपारी रोपांचे व बिस्कीट पुड्यांचे वितरण बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे वेंगुर्ला तालुका प्रमुख नितीन मांजरेकर व पदाधिका­यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यामध्ये परबवाडा नं.१, वेंगुर्ला नं.१, वेंगुर्ला नं.२, दाभोसवाडा, राणी लक्ष्मीबाई कन्याशाळा, वेंगुर्ला नं.३, शिवाजी प्रागतिक, भटवाडी नं.१, भटवाडी नं.२, वडखोल लोपाद्रेश्वर, वेंगुर्ला नं.४ आदी शाळांचा समावेश होता. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, शहर प्रमुख उमेश येरम, देवस्थानचे मानकरी सुनिल परब, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, राजू परब, बाळा परब, अॅड.श्रध्दा बावीस्कर, बाळू सावंत, वेंगुर्ला तालुका मच्छीमार सेलचे तालुका अध्यक्ष गणपत केळूसकर, प्रकाश मोटे, परबवाडा सरपंच शमिका बांदेकर, उपसरपंच पपू परब, उभादांडा ग्रामपंचायत सदस्य तेजश्री कुबल व शिवसैनिक, सुशिल चमणकर, गोपाळ तोरस्कर, सँमसन फर्नांडिस, संजय परब, नितू परब, प्रतिक्षा पाटकर, सावली आडारकर, श्यामसुंदर कोळंबकर, शिवाजी पडवळ, मुख्याध्यापक वासुदेव कोळंबकर, शिक्षक कपुरगौर जाधव, निना मार्गी, राजश्री भांबर, तमन्ना अत्तार तसेच प्रत्येक शाळेच्या ठिकाणी त्या त्या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu