वेंगुर्ला शहरात उत्साहात रामनवमी साजरी

वेंगुर्ला तालुक्यातील ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये गुरुवारी भक्तिमय वातावरणात रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. श्रीरामाच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला.

      ग्रामदैवत श्री रामेश्वर मंदिर परिसरात असलेल्या राम मंदिरात रामसीतेची आकर्षक पूजा बांधण्यात आली. ११ वाजता ह.भ.प.अरुणबुवा सावंत यांचे रामजन्माचे कीर्तन झाले. त्यानंतर रामजन्म होऊन श्रीरामाची पालखीतून भजनासहीत प्रदक्षिणा काढण्यात आली. दुपारी १ वाजता आरती होऊन उपस्थितांना प्रसाद वाटण्यात आला. मारुती स्टॉप येथील हनुमान मंदिरात ह.भ.प.अवधुत बुवा नाईक यांचे राजन्माचे कीर्तन होऊन रामजन्म करण्यात आला. सायंकाळी भजन आणि आरतीने उत्सवाची सांगता झाली.

      तर शहरातील भाऊ मंत्री यांच्या राममंदिरातकुबलवाडा येथील राम व मारुती मंदिरातरहाटाच्या विहिरीकडील मारुती मंदिरात रामजन्म करण्यात आला.

Leave a Reply

Close Menu