गोवा येथील कॅश्यू फेस्टमध्ये वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी सहभाग घेऊन केंद्राने प्रसारित केलेल्या काजूच्या वेंगुर्ला १ ते वेंगुर्ला ९ या जातीच्या बी व गरांचा तसेच काजू बोंडू, आवळा, जायफळ, कोकम यांचे सिरप आणि आवळा, जायफळ कॅन्डीचा स्टॉल लावला. या स्टॉलला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भेट देऊन कौतुक केले. यावेळी प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे उद्यानवेत्ता, काजू आणि प्रयोगशाळा प्रमुख डॉ.आर.टी.भिगार्डे, कीटकशास्त्रज्ञ डॉ.विजयकुमार देसाई, कनिष्ठ काजू पैदासकार एल.एस.खापरे, प्रयोगशाळा सेवक मुल्लाणी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.