‘शोध दहशतवादाचा‘चे प्रकाशन

दिवंगत पत्रकार आणि महाराष्ट्र टाइम्सचे माजी वृत्त संपादक पुरुषोत्तम महाले यांनी लिहिलेल्या शोध दहशतवादाचाया पुस्तकाचा प्रकाशन समारंभ २२ एप्रिल रोजी दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक निळू दामले व ज्येष्ठ पत्रकार, अर्थ विश्लेषक हेमंत देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी मुंबई विद्यापीठाचे राज्यशास्त्र प्रा.दिपक पवार, हेमंत कर्णिक, शोभराज बुवा, विराज महाजन, मुंबई विद्यापीठाचे  ग्रंथपाल डॉ.नंदकिशोर मोतेवार, सुधाकर श्रोत्री, अपना सहकारी बँक संचालक जगदीश नलावडे, सुरेश केदारे, अभिनेते सचित पाटील, अनिल पडवळ उपस्थित होते. या पुस्तकाला निळू दामले यांची प्रस्तावना लाभली असून संपादन प्रा.डॉ अभिजीत महाले यांनी केले आहे. प्रास्ताविकात पुरुषोत्तम महाले यांचा जीवनपट उलगडून दाखवला. मुलगा सत्यजित महाले यांनी पुरूषोत्तम महाले यांच्या अमेरिकेतील आठवणी सांगून त्यांचे अखेरपर्यंत स्वावलंबी जीवन आणि विविध सामाजिक, राजकीय समस्यांचा अभ्यास कसा निष्ठेने सुरू ठेवला. ज्ञान आणि पुस्तके यांची साथ त्यांनी सोडली नाही असे सांगून त्यांच्याप्रती ऋण व्यक्त केले.

Leave a Reply

Close Menu