ब्राझिल येथील बावसकर दांपत्यांची फळ संशोधन केंद्राला भेट

मूळ भारतीय व ब्राझिल येथील किप दी बॅल रोलिग तंत्रज्ञान आणि संशोधन संस्थेचे संस्थापक विजय बावसकर व दीपाली बावसकर यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राला भेट दिली. यावेळी कोकणातील वाया जाणारा काजू बोंडू ब्राझिलच्या धर्तीवर उपयोगात आणण्यासाठी काय करता येई यासंदर्भात येथील शास्त्रज्ञकाजू कारखानदार व काजू उत्पादक यांच्याशी चर्चा केली.

      बावसकर यांनी येथील वाया जाणा-या काजू बोंडूपासून काजू वाईनकाजू पल्पकाजू ज्यूसनेक्टर व काजू बोंडूच्या चोथ्यापासून जनावरेपक्षी यांच्यासाठी खाद्य तयार केल्यास येथील ९५ टक्के काजू बोंडू वापरात येऊन त्यातून काजू उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. काजू बोंडूपासून उच्च दर्जाची उत्पादन घेण्यासाठी काढणी व हाताळणी योग्यप्रकारे केली पाहिजे. फळ संशोधन केंद्रात असलेल्या चार प्रयोगशाळा या ब्राझिल येथे असलेल्या प्रयोगशाळांच्या तोडीच्या आहेत. त्याचा उपयोग काजू उत्पादक शेतक-यांनी करुन घेतला पाहिजे असे स्पष्ट केले.

      यावेळी वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ.राजन खांडेकरउद्यानवेता डॉ.महेंद्र गव्हाणकररोहा येथील काढणी पश्चात अभियांत्रिकी विभागाचे डॉ.श्रीकांत स्वामीप्रा.प्रकाश रेळेकरआंबा-काजू बागायतदार संघाचे जिल्हाध्यक्ष जयप्रकाश चमणकरमहाराष्ट्र कॅश्यू असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकरबिपिन वरसकरराजन पोकळेउमेश येरमअस्मिता एम.जे.फळ संशोधन केंद्र वेंगुर्ल्याच्या डॉ.स्मिता देशमुखडॉ.एम.पी.सणसललित खापरेडॉ.संजय चव्हाणए.जी.साटेलकर आदी उपस्थित होते. 

Leave a Reply

Close Menu