क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर भोगवे किना-यावर

जगभरातील क्रिकेट प्रेमींचा लाडका व भारतीय क्रिकेटविश्वाचा देव सचिन तेंडुलकर परुळे गावांतील सागर किनारी अवतरला. त्याने परुळे गावातील समुद्री पर्यटनाचा आनंद लुटला. भोगवे, किल्ले निवती सागर किना-यावर त्याने पर्यटनांचा आनंद घेतला.

        क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आपला ५० वा वाढदिवस साजरा करीत आहे. त्यातुन वेळ काढून त्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना भेट दिली. नुकतीच त्याने परुळे-भोगवे येथील हॉटेलमध्ये मुक्काम केला. किल्ले निवती, भोगवे सागर किना-याला फेर फटका मारला. यावेळी सर्वच क्रिकेट प्रेमींना त्यांच्या दर्शनाने खूपच आनंद झाला. त्याने सर्वांसोबत फोटो काढले. यावेळी त्याचे सहकारी उपस्थित होते.

         क्रिकेटच्या निमित्ताने सचिन जगभर फिरले आहेत. परंतु भोगवे – निवती सारखा सुंदर, स्वच्छ सागर किना-यावर फिरताना त्याला विशेष आनंद झाला.

Leave a Reply

Close Menu