थापाड्या लोकांना घरी बसविण्याची वेळ-राऊत

आडेली जि.प.मतदार संघातील स्वयंभू मंगल कार्यालय मठ येथे २२ एप्रिल रोजी उबाठाचे उमेदवार विनायक राऊत यांची प्रचार सभा संपन्न झाली. यावेळी माजी राज्य मंत्री प्रविण भोसले, संजय पडते, शैलेश परब, अर्चना घारे-परब, इर्शाद शेख, साक्षी वंजारी, विवेक ताम्हणकर, जान्हवी सावंत, बाळा गावडे, भालचंद्र चिपकर, यशवंत परब, प्रकाश गडेकर, सुकन्या नरसुले, योगेश कुबल, अॅड.जी.जी. टांककर, संदेश निकम, रमण वायंगणकर, पंकज शिरसाट, संदीप पेडणेकर, दीपिका राणे, दीक्षा पालव, अजित राऊळ, संजय गावडे, मनोहर येरम आदी उपस्थित होते. वेंगुर्ल्यातील चिपी विमानतळ स्वतः उद्योग मंत्री असताना नारायण राणे यांनी खाजगी ठेकेदाराला का दिले? ते एमआयडीसीच्या माध्यमातून का केले नाही? २००५ मध्ये राडेबाज विकृती वेंगुर्ल्यात आणायचं काम या राणेंनी केले अशी जोरदार टीका खासदार विनायक राऊत यांनी करत या थापाड्या लोकांना घरी बसवण्यासाठी मशाली समोरील बटन दाबा असे आवाहन केले.

     विनायक राऊत यांनी लोकसभेत कोकणातील अनेक प्रश्न मांडले, त्याठिकाणी सोडवूनही घेतले आणि त्यामुळे त्यांना संसद रत्न पुरस्कारही मिळाला. म्हणूनच आता मोदी सरकारला सत्तेत न आणता राऊत यांना संसदेत पाठवा असे आवाहन प्रविण भोसले यांनी केले. आपल्याला शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे राज्य आणायचे आहे यासाठी विनायक राऊत यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन अर्चना घारे-परब यांनी केले. स्वतःचे स्वार्थी राजकारण करण्याचे काम दीपक केसरकर करत आहेत. सामंत बंधूंना फसवले, पुढे शिंदेंच्या पाठीत सुद्धा खंजीर खुपसून भाजपात जातील असे शैलेश परब यांनी सांगितले.

     दीपक केसरकर सत्तेची लाचारी तुमच्या देहामध्ये भरलेली आहे. शरद पवार, प्रविण भोसले त्यानंतर उद्धव ठाकरे यांना फसवलं आणि आता एकनाथ शिंदे यांच्या सुद्धा दाढीला हात लावून केसरकर देवेंद्र फडणवीस यांच्या तंबूत कधी पळाले हे त्या किरण सामंताना कळलेच नाही.

     ग्रामीण भागातील तळागाळात जर जायचं झालं तर दीपक केसरकर तुमची व्हॅनल्टिव्ह जाईल का? केसरकर यांची कीव वाटते, या मतदार संघावर तुमचा अधिकार आहे असा तुम्ही उल्लेख करता आणि मतदारसंघातील एकही घर तुम्हाला आराम करायला, भाकरी खायला, विश्रांती घ्यायला मिळत नाही हे दुर्दैव आहे आणि म्हणून त्यांनी व्हॅनिटी व्हॅन घेतली असल्याची टीका विनायक राऊत यांनी केली.

 

Leave a Reply

Close Menu