राम नवमीनिमित्त विविध स्पर्धा संपन्न

विश्व हिदू परिषद, वेंगुर्ला प्रखंडतर्फे भाऊ मंत्री यांच्या राम मंदिरामध्ये १७ एप्रिल रोजी मारूती स्तोत्र, श्री रामरक्षा व हनुमान चालिसा पाठांतर स्पर्धा घेण्यात आली. यात वेंगुर्ला, तुळस, शिरोडा व सावंतवाडी येथील स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेंचा निकाल पुढीलप्रमाणे – मारूती स्तोत्र पठण – प्रथम-रघुवीर अमृत काणेकर, द्वितीय-विनायक श्रीकृष्ण ओगले, तृतीय-मृदा मांगिरीश कुलकर्णी, उत्तेजनार्थ- श्रेया भूजान बांबर्डेकर व प्रभास मांगिरीश कुलकर्णी. रामरक्षा पठण-प्रथम- माधव श्रीपाद ओगले, द्वितीय-चिन्मयी मोहन जोशी, तृतीय-भाविक विष्णू सावंत, उत्तेजनार्थ-रिद्धी केदारनाथ जाधव व देवश्री विनायक पुराणिक. हनुमान चालिसा पाठांतर-प्रथम-प्रणव गजानन केसरकर, द्वितीय-वरद वल्लभ शिरोडकर, तृतीय-मैत्रेय राजाराम दळवी. तिन्ही गटातील प्रथम तीन क्रमांकास अनुक्रमे ५००, ३००, २०० व १०० अशी रोख बक्षिसे भाऊ मंत्री यांच्याकडून देण्यात आली. तसेच शैक्षणिक साहित्य व प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण रत्नप्रभा प्रभूसाळगांवकर, स्मिता मांजरेकर, अर्पणा रेगे व निता मांजरेकर यांनी तर स्पर्धेचे नियोजन अॅड.सुषमा प्रभूखानोलकर यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी भाऊ केरकर, प्राची मणचेकर, अश्विनी सामंत, मधुरा आठलेकर, चेतना रजपूत, निलम रेडकर, संगिता कुबल, रेखा आरोसकर, श्रेया मयेकर, स्वप्नाली धोंड, अल्पा भानुशाली, सीमा भानुशाली, पल्लवी कामत, विलासिनी गोळे, सुहास गोळे, वैशाली वैद्य, आसावरी गिरप, रसिका मठकर यांनी सहकार्य केले. बक्षिस वितरण अजित राऊळ, बाबूराव खवणेकर, दिलीप मुळीक, वृंदा गवंडळकर व भाऊ मंत्री यांच्या हस्ते झाले. प्रखंड मंत्री आप्पा धोंड यांनी आभार मानले.

 

 

Leave a Reply

Close Menu