नारायण राणेंना या भागाची सेवा करण्याची संधी द्या!

लोकसभेच्या निवडणूक प्रचारार्थ २२ एप्रिल रोजी वेंगुर्ला तालुक्यात निलमताई राणे यांनी झंझावती दौरा केला. वेंगुर्ला शहर, आडेली व उभादांडा जि.प.मतदार संघाचा मेळावा स्वामिनी मंगल कार्यालयात झाला. या मेळाव्याला महिलांची मोठी उपस्थिती होती. गेली ३४ वर्ष केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणात विविध माध्यमातून विकासात्मक कामे करत आहेत. महायुतीच्या माध्यमातून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात राणे साहेबांना उमेदवारी मिळाली आहे. महिलांनी त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना या भागाची सेवा करण्याची संधी द्यावी. यासाठी त्यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन निलम राणे यांनी केले.

     यावेळी भाजपाच्या श्वेता कोरगावकर, अस्मिता बांदेकर, संध्या तेरसे, सुमेधा पाताडे, अॅड.सूषमा प्रभूखानोलकर, प्रज्ञा परब, सुजाता पडवळ, वंदना किनळेकर, सारीका काळसेकर, सुजाता देसाई, गौरवी मडवळ, प्राजक्ता चिपकर, श्वेता चव्हाण, प्रणाली बंगे, सीमा सावंत, दिपा दाभोलकर, स्मिता दामले, श्रेया मयेकर, कृपा मोंडकर, प्रार्थना हळदणकर, हेमा गावस्कर, पुनम जाधव, रूपाली नाईक, प्राची नाईक, शमिका बांदेकर, वैभवी मालवणकर यांच्यासह शिवसेना महिला पदाधिकारी उपस्थित होते.

     परुळेबाजार येथील महायुती महिला मेळाव्यात नारायण राणे यांना मतदान करून खासदारकीच्या माध्यमातून सेवा करण्याची पुन्हा एक संधी द्या असे आवाहन निलम राणे यांनी केले. यावेळी कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, प्रसाद पाटकर, प्रकाश राणे, गुरुनाथ मडवळ  यांसह महिला पदाधिकारी उपस्थित होते.

     रेडी जि.प.मतदार संघाचा मेळावा रेडकर हॉस्पिटल सभागृहात संपन्न झाला. या मेळाव्यात रेडी येथील उबाठा सेना पदाधिकारी नमिता बागायतदार यांनी सहका­यांसमवेत निलम राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी आजगाव सरपंच यशश्री सौदागर यांनी या मतदारसंघातून नारायण राणे यांना मतदान करणे का गरजेचे आहे याची माहिती दिली. तसेच शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक नीता कविटकर यांनी पुन्हा एकदा मोदी सरकार आणण्यासाठी आणि आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी धडाडीचे नेतृत्व नारायण राणे यांनाच मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी शिवसेना प्राची नाईक, उत्कर्षा गावकर, मेघा गांगण, प्राची कुबल, आसावरी, रश्मी पेडणेकर, समिर कांबळी, रेडी सरपंच रामसिंग राणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

     दरम्यान महायुतीचा शेवटचा मेळावा तुळस जि.प. मतदार संघात उत्सव मंगल कार्यालयात झाला. या मेळाव्यालाही महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला.

Leave a Reply

Close Menu