मतदान जनजागृतीपर उपक्रम

रत्नागिरी-सिधुदुर्ग लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार जनजागृती व मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रबोधनपर उपक्रम राबविण्याबाबत जिल्हाधिका­यांच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार वेंगुर्ला न.प.तर्फे १० ते १९ एप्रिल या कालावधीत सेल्फी पॉईंट उपक्रम व मतदार हस्ताक्षर अभियान राबविण्यात आले. तर न.प.हद्दीतील सर्व प्रभागांमध्ये घंटागाडीद्वारे रोज मतदान जनजागृती करण्यात येत आहे. 

    वेंगुर्ला नं.१, वेंगुर्ला नं.२, वेंगुर्ला नं.३ या शाळांमध्ये व वेंगुर्ला हायस्कूल, पवनपुत्र भाजी मंडई, सागररत्न मच्छी मार्केट, म्हाडा वसाहत, जुना एसटी स्टॅण्ड, अमृता कॅश्यू फॅक्टरी, वारंग काजू फॅक्टरी, कुबलवाडा दत्त मंदिर, आनंदवाडी येथे मतदार शपथ कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व दिले. बॅ.खर्डेकर महाविद्यालय, मार्केट, दाभोली नाका, जुना एसटी स्टॅण्ड, वेशी भटवाडी, पॉवर हाऊस, पिराचा दर्गा, एसटी स्टॅण्ड, बंदर, सातेरी मंदिर या ठिकाणी बॅनर उभारून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. पाटकर हायस्कूल व वेंगुर्ला हायस्कूलच्या विद्यार्थ्यांमार्फत मानवी शृंखलेद्वारे मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच लोकशाही दिडी, पथनाट्य, वाळू शिल्प अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात येणार आहे. या उपक्रमांमध्ये नागरिकांनी सहभागी होऊन ७ मे रोजी मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे.

Leave a Reply

Close Menu