माझी अमेरीका सफर

America is hope. It is compassion. It is excellence.It is Valor.

          अमेरीका हे आमच्यासाठी स्वप्न होते आणि ते आमच्यासाठी साकार केले ते आमची कन्या अनुरीमा हिने. अमेरिकेच्या आमच्या वास्तव्यात तिकडचे जीवन अगदी जवळून अनुभवण्यास मिळाले.

      अमेरिकेत आम्ही पाहिले की, तरुणाई स्वावलंबी आहे. अगदी विद्यार्थीदशेत असतानाच लहान मोठी कामे करून ते स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करतात. कोणतेही काम करण्यास अजिबात कोणताही संकोच बाळगत नाहीत. ज़्दृद्धत्त् त्द्म ध्र्दृद्धद्मण्त्द्र चे धडे अगदी किशोर वयापासून गिरवताना अमेरिकन युवा पिढीला आम्ही पाहिले. आठवड्याचे शेवटचे दिवस मात्र आनंदात व्यतीत करतात. वेगवेगळे महोत्सव, खेळ किवा तत्सम काही गोष्टींमध्ये weekend  अगदी celebrate’ करतात. एकूण काय तर खूप काम आणि खूप मज्जा असे एकूण इकडील जीवनाचे समीकरण.

      अमेरिकेत स्त्री पुरुष समानता ब­यापैकी आहे. अगदी पब्लिक ट्रान्सपोर्टच्या बसेसही अमेरीकन महिला सहजतेने चालवताना दिसतात. असाच एक किस्सा या लेखाच्या निमित्ताने सांगितला पाहिजे.

      आम्ही सिएटल मधून लॉस एंजेलिस येथे जात असतानाचा हा प्रसंग आहे. लॉस एंजेलिस विमानतळावरील एका बसने आम्ही प्रवास करत होतो. बसचालक अर्थात एक महिला होती. काही वेळाने एक दिव्यांग प्रवासी बसमधे प्रवेश करू लागला तर स्वतः चालक बस थांबवून त्या प्रवाशाच्या मदतीसाठी पुढे सरसावली. इकडे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की, अमेरिकेतील सर्व वाहने दिव्यांग स्नेही (Handicapped Freindly) असतात. त्याप्रमाणे ती बसही तशीच होती. महिला चालकाने बसमधील दिव्यांग प्रवाशाला त्याच्या wheelchair सहित आत येण्यास सुलभ होईल असा automated ramp   बटन दाबून उघडला आणि प्रवाशास आत घेतले. त्याची wheelchair मजबूत अशा साखळीने चारही बाजूने बसमधे असलेल्या एका विशिष्ठ जागी स्थानबद्ध केली आणि नंतर बस पुढे मार्गक्रमण करू लागली. एका प्रवाशासाठी किती ही काळजी!

    अमेरीका ही अशीच आहे; इकडे व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार तर केला जातोच पण प्रत्येक व्यक्तीलाही खूप महत्व दिले जाते. त्यामुळेच शाळेत गैरहजर मुलांना वर्गशिक्षक स्वतः फोन करून विचारपूस करतात आणि तो/ती विद्यार्थी शाळेसाठी किती महत्त्वाचा आहे आणि शिक्षकाचे त्याच्यावर किवा तिच्यावर किती प्रेम आहे हे पटवून दिले जाते. ‘I Love You’ हा शब्दप्रयोग अमेरिकेत फार महत्त्वाचा. आपल्याला वाटणारा प्रेमी / प्रेमिकांचा असा हा परवलीचा शब्द अमेरिकेत मात्र शिक्षक-विद्यार्थी, पालक आणि मुले, मित्र-मैत्रिणी, नवरा आणि बायको सर्रास वापरताना दिसतात. भारतात नव्या नवलाईचे काही दिवस सोडले तर पती पत्नी पण एकमेकांना ‘I Love You’ म्हणण्यास कचरतात. माझा हा लेख वाचल्यानंतर आपल्या जवळच्या व्यक्तीला म्हणून बघा ना I Love You. आपल्या बहिणीला म्हणा…आईवडिलांना म्हणा किवा सासूने सुनेला, सुनेने सासूला…सांगा तुमच्या मनातल्या व्यक्तीला माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून …

      अमेरिकेत आम्ही Farmers Markets  पाहिली. ही markets  म्हणजे शेतक­यांचा बाजार. मासे, भाजी, फळे, फुले इकडे अगदी वाजवी दरात मिळतात आणि लोकही आवर्जून खरेदी करतात. मुख्य म्हणजे दर कमी करून मागत नाहीत. ताजी फळे, फुले, भाजी डायरेक्ट उत्पादकांकडून मिळतात म्हणून असेल त्या किमतीला घासाघीस न करता खरेदी केले जातात. आवर्जून अशा Farmers Markets ना हजेरी लावली जाते. या मार्केट्सना एखाद्या उत्सवाचे रुपच या ठिकाणी आलेले असते.

      अमेरिकेतील वाचनालये किबहुना पब्लिक लायब्ररी आवर्जून भेट द्यावी अशी जागा. आम्ही सिएटल येथील पब्लिक लायब्ररीला भेट दिली. प्रचंड मोठी अकरा मजली इमारत. सर्व ज्ञान शाखांची आणि विविध भाषांमध्ये लिहिलेली पुस्तके येथे आहेत. संगणक, लॅपटॉप, प्रिटर अशी आधुनिक सामुग्री येथे आहे. एकावेळी एका सदस्याला ५० पुस्तके घरी घेऊन जाता येतात. काही कालावधीसाठी पुस्तके  Kindle वर download करता येतात.  Moolesworth च्या मराठी-इंग्रजी डिक्शनरीची पहिली आवृत्ती आम्हाला येथे पाहता आली. अभ्यासू व्यक्तीला सर्व प्रकारची मदत ही वाचनालये देऊ करतात आणि हे सर्व विनामूल्य. शहरातील जमा झालेल्या करांतून हे सर्व केले जाते. वाचनालयांचे काही नियम मात्र असतात आणि त्यांची कडक अंमलबजावणी केली जाते.

      अमेरिकेतील नियमांची कडक अंमलबजावणी आपल्याला सर्वत्र जाणवते. अगदी रस्त्यांवर रहदारीलाही हे लागू पडते. तुम्हाला कोणीही वाहतूक पोलीस नजरेला पडणार नाही पण नियम मात्र कोणी मोडत नाहीत आणि मोडलेच तर कडक शिक्षा आहे. त्यातून सुटका नाही. त्यामुळे नियम मोडण्यास कोणी सहसा धजावत नाही. अगदी बसेस आणि ट्रेन मध्ये सुद्धा प्रवासी एका रांगेत आत प्रवेश करताना तुम्हाला दिसतील.

      अमेरिकेत अगदी नमूद करण्यासारखी एक गोष्ट आम्ही पाहिली ती म्हणजे अमेरिकेत दुकानदार असोत किवा बसने प्रवास करताना बस ड्रायवर, टॅक्सी ड्रायवर तुमचे अगदी आपुलकीने स्वागत करतील, प्रेमाने चौकशी करतील. डोक्याला आठ्या घालणार नाहीत. तुम्ही त्यांच्यासाठी किती महत्त्वाचे आहात हेच तुम्हाला ते जाणवून देतील. आम्हाला तर एका भारतीय बस चालकाने आम्ही भारतीय असल्याचे कळल्यावर फुकट प्रवास घडवलेला. तिकडचे बस चालक सुट्ट्या पैशांसाठी वाद घालत नाहीत.

      सिएटलमध्ये आम्ही असताना अजून एक नोंद घेण्यासारखी गोष्ट आम्हाला जाणवली ती म्हणजे अमेरीकन त्यांच्या निसर्गाचे, त्यांच्या भूभागाचे प्राणपणाने संरक्षण करतात. ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण आणि संवर्धन करणारा कायदा तर अमेरिकेत  सन १९२० मध्येच संमत करण्यात आला आहे. सिएटलमध्ये डोंगराळ भाग आहे. तिथे अगदी शेवटपर्यंत रस्ते तयार केलेत. तुम्ही वाहने घेऊन जाऊ शकता (अमेरिकेत प्रत्येकाकडे वाहन असतेच ही आणखी एक नमूद करण्यासारखी गोष्ट.) पण मूळ डोंगराचा चढ उतार कायम ठेवलेला आहे. डोंगर खणून रस्ते सपाट केलेले नाहीत. तसेच रस्त्यांच्या दुतर्फा अनेक शोभिवंत फुलांची, पानांची झाडे लावलेली आढळून येतात. अगदी गुलाबांची झाडे सुद्धा असतात पण कोणीही झाडे ओरबाडून नेणार नाहीत. फुलांना हात लावणार नाहीत. निसर्गाचे रक्षण करतात. झाडे दिसतायत म्हणून तिकडे कचरा टाकणार नाहीत. कच­याचंही ओला, सुका, recycleable  असे वर्गीकरण असते. त्याप्रमाणेच नेमून दिलेल्या कचरा कुंड्यांमध्येच कचरा टाकला जातो. मी पाहिले अगदी छोटी मुलेही हे नियम कसोशीने पाळतात.

      अमेरीकन शिक्षणाची तर गोष्टच न्यारी. अमेरीकन विद्यापीठे हा तर आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय. शेकडो एकर जमिनीवर विस्तारलेली ही विद्यापीठे. आम्ही अमेरिकेत दोन विद्यापीठे पाहिलीUniversity of Washington   आणि University of Southern California     अशी ही दोन विद्यापीठे. अमेरिकेतील विद्यापीठे संपूर्ण पाहण्यासाठी अनेक दिवस लागू शकतात. रात्रंदिवस ज्ञानार्जनाचे काम येथे चालते. विद्यार्थ्यांना अनेक सुविधा येथे पुरविल्या जातात. सुसज्ज वाचनालये आणि प्रयोगशाळा असतात. विद्यार्थ्यांच्या खेळांची, व्यायामाची आणि इतर कलांची आवडही येथे जोपासली जाते. प्राध्यापक वर्ग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास सदैव तत्पर असतात.

      तर अशी ही आम्ही पाहिलेली अमेरीका. अमेरिकेची नकारात्मक बाजूही आहे. अमेरिकेतही गरिबी आहे, बेकारी आहे आणि अमेरीकन beggars  आणि गोळीबाराची समस्या तर सर्वश्रुत आहे. पण तरीही अमेरीका एक मुक्त राष्ट्र आहे जिथे व्यक्तिस्वातंत्र्याची पायमल्ली होत नाही आणि जिथे राष्ट्रप्रेमाला सर्वोच्च स्थान दिलेले आहे.                                                                           सौ. उमा अनिल पडवळ, वाशी, नवी मुंबई.-९९२००२२५००

 

 

 

 

Leave a Reply

Close Menu