ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न

आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून तालुका विधी सेवा समिती वेंगुर्ला, तालुका वकिल संघटना वेंगुर्ला व ज्येष्ठ नागरिक संघ, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने १ ऑक्टोबर रोजी साई मंगल कार्यालय येथे जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात तालुका विधी सेवा समिती वेंगुर्ला, तालुका वकिल संघटना वेंगुर्ला तर्फे अॅड.एन.जे.गोडकर यांनी ज्येष्ठ नागरिकांचे अधिकारी व कायदे याबाबत मार्गदर्शन केल. यावेळी व्यासपिठावर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष एस.एस.काळे, रमेश पिगुळकर, जनार्दन गोडकर, का. हु. शेख आदी तर सुमारे ५५ ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी वेंगुर्ला दिवाणी न्यायाधीश के.के.पाटील व सहदिवाणी न्यायाधीश डी.वाय.रायरीकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Close Menu