संकेतस्थळामार्फत सहभाग प्रमाणपत्र मिळवा

केंद्र शासनाने आयोजित केलेल्या स्वच्छता पंधरावड्यांतर्गत वनविभाग सावंतवाडी आणि मांडवी खाडी किनारी कांदळवन मालवणतर्फे स्वच्छता ही सेवाअंतर्गत वेंगुर्ला मांडवी खाडी किनारी कांदळवन क्षेत्र परिसरात राबविण्यात आलेल्या स्वच्छता उपक्रमास प्रतिसाद लाभला. यावेळी सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक एस.नवकिशोर रेड्डी, मालवण कांदळवन कक्षाचे वनक्षेत्रपाल प्रदिप पाटील, कुडाळ वनक्षेत्रपाल एस.एस.कुंभार, स्वामिनी बचत गट, रोट्रॅक्ट क्लब वेंगुर्ला मिडटाऊन, वेताळ प्रतिष्ठान सिधुदुर्ग, कांदळवन सहव्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, कांदळवन प्रतिष्ठान व युएनडीपी, जीसीएफ प्रकल्पाचे कर्मचारी, वेंगुर्ला नगरपरिषदेचे कर्मचारी आदी उपस्थित होते. स्वच्छता ही सेवाया मोहिमेत सहभागी नागरिकांनी आपण स्वच्छता करतानाचा फोटो https:// swachhatahiseva.com/ या संकेतस्थळावर अपलोड करून आपले सहभाग प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन उपवनसंरक्षक एस.नवकिशोर रेड्डी यांनी केले.

Leave a Reply

Close Menu