रंगोत्सव सेलिब्रेशन स्पर्धा मुंबई यांच्यातर्फे २०२३-२४ मध्ये घेतलेल्या विविध स्पर्धेत प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यात नॅशसन सिल्वर अवार्ड-आर्या कुडाळकर, आर्ट मेरिट अवार्ड-केतकी चेंदवणकर व चिन्मय पेडणेकर, विशेष पारितोषिक वेदा देसाई, आस्था कुडाळकर, प्राप्ती मोरे, तनिशा सातार्डेकर यांचा समावेश असून शाळेच्या १६ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक, १५ विद्यार्थ्यांनी रौप्य तर ११ विद्यार्थ्यांनी कांस्य पदक प्राप्त केले. विद्यार्थ्यांना शिक्षिका संजया परब यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वीतांना मुख्याध्यापका मिताली होडावडेकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व पदक देऊन गौरविण्यात आले. यावेळी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.