वेंगुर्ला ज्येष्ठ नागरिक संघाचा रौप्य महोत्सव संपन्न

      वेंगुर्ला ज्येष्ठ नागरिक संघ वर्धापनदिन व आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन, संघाचे संस्थापक अध्यक्ष रा.पां.जोशी यांच्या अध्यक्षतेखाली साई मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. यावेळी ॲड.नारायण गोडकर यांनी ज्येष्ठ नागरिक समस्या व गैरसमज आणि 2007 चा ज्येष्ठ नागरिक कायदा, त्याची तरतूद याबाबत मार्गदर्शन केले. रा.पां.जोशी यांनी 25 वर्षांच्या वाटचालीचा आढावा व आपल्या सामाजिक सेवेचा अहवाल सांगून ज्येष्ठ नागरिकांनी आपले जीवन आनंददायी कसे करता येईल याबाबत मार्गदर्शन केले.

      या कार्यक्रमात 75 वर्षे पूर्ण झालेल्या अशोक गवंडे, सुशांती बागायतकर, शशिकांत खोत, मधुकर गावडे, कृष्णा राऊळ, तुकाराम ठुंबरे, प्रकाश परब, हेमलता गडदे, गणेश मेतर, सुधाकर परब यांचा तसेच वैवाहिक जीवनाची 50 वर्षे पूर्ण झालेल्या सूर्यकांत बागायतकर, सुभाष परब, प्रकाश परब, तुकाराम ठुंबरे या दांपत्यांचा सत्कार करण्यात आला. संघाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. रमेश पिंगुळकर, अशोक गवंडे, प्रकाश परब, गणेश मेतर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्याधर कडुलकर यांनी तर आभार जगदिश तिरपुडे यांनी मानले.

 

 

 

 

 

Leave a Reply

Close Menu