वागळे, आव्हाड विरोधात तक्रार देणार

साई दरबार सभागृह येथे सनातन धर्म नष्ट करणा­यांच्या विरोधात हिदू जनजागृती समितीतर्फे ‘मी सनातन धर्मरक्षक‘ अभियाना अंतर्गत सनातन धर्म नष्ट करण्याचे अर्बन नक्षलवाद्यांचे षडयंत्र या विषयावर बैठक आयोजित केली होती. यावेळी सनातन संस्थचे धर्मप्रचारक अभय वर्तक यांनी पुरव्यासह सचित्र माहिती दिली. २०१५ ते १९या ४ वर्षात सिंधुदुर्गात परदेशातून ६५०० कोटी रुपये आले आहेत. हे कायद्या अंतर्गत शासनाने उघड केले आहे. ते पैसे कशासाठी आले, त्या पैशांचा विनियोग नक्की कशासाठी केला गेला. जिल्ह्यात गांजा, ड्रग सारख्या प्रकरणात तरुण हिदू मुलांना गुंतवून त्यांचे आयुष्य बरबाद करण्याचा डाव सुरू आहे, त्यामुळे या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोलीस यंत्रणा पोहचण्यासाठी प्रयत्न करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. महाराष्ट्रात निखिल वागळे यांच्यासारखे पत्रकार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड हेही सनातन धर्म संपविण्याच्या भूमिकेला पाठिंबा घोषित करून सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड आहे, अशा प्रकारची हिंदू धर्मावर विखारी टीका करत आहेत. हे वेळीच रोखण्यासाठी धर्माच्या विरोधात गरळ ओकणा­या वागळे आणि आव्हाड यांच्या विरुध्द पोलिसांकडे तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याचा निर्णय वेंगुर्लावासीयांनी बैठकीत केला. यावेळी अॅड.सुषमा प्रभुखानोलकर, आशिष पाडगावकर, विजय रेडकर, श्री. लिंगोजी, शिवदत्त सावंत, चंद्रहास नार्वेकर, महेश वेंगुर्लेकर, अजित राऊळ, प्रताप गावस्कर, वृंदा गवंडळकर, सुधाकर धोंड, श्रीकृष्ण पेडणेकर यांच्यासह अन्य धर्माभिमानी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार महेश जुवलेकर यांनी मानले.

 

Leave a Reply

Close Menu