रसिका पालकर पैठणीच्या मानकरी; दीपावली शो टाईम संपन्न

वेंगुर्ला बाजारपेठ मित्रमंडळ व वेंगुर्ला शहर शिवसेनातर्फे गाडीअड्डा नाका येथे 16 ते 18 नोव्हेंबर कालावधीत दीपावली शो टाईम संपन्न झाला. उद्घाटन सचिन वालावलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी उमेश येरम बाळा दळवी, सुनिल डुबळे, संतोष परब, रविना राऊळ, मनाली परब, शाम कौलगेकर, प्रभाकर पडते, रमेश येरम यांच्यासह बाजारपेठ मित्रमंडळाचे  पदाधिकारी उपस्थित होते.

      वेंगुर्ला शहरात विकासात्मक काम करत असताना वेळोवेळी येथील व्यापा¬यांच्या प्रश्नांना शासन दरबारी वाचा फोडण्याचे काम दीपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून झाले आहे. यापुढेही इतर प्रश्न सोडविण्यासाठी व्यापा¬यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असे आश्वासन सचिन वालावलकर यांनी व्यापा¬यांना दिले. समाजाचे देणे लागतो या भावनेतून बाजारपेठ मित्रमंडळाने या दीपावली शो टाईमचे केलेले आयोजन हे कौतुकास्पद असल्याचे उमेश येरम यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी वेंगुर्ला, कुडाळ, कणकवली, सावंतवाडी, पिंगुळी येथील नामवंत नृत्य कलाकारांचे रेकॉर्ड डान्स संपन्न झाले. रेकॉर्ड डान्समधील सहभागी झालेल्या सर्वांना रोख रक्कम, ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

                17 नोव्हेंबर रोजी संपन्न झालेल्या खेळ पैठणीचा कार्यक्रमात सुमारे 33 महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. रसिका पालकर या पैठणीच्या मानकरी ठरल्या. त्यांना पॉप्युलर क्लॉथ स्टोअर्सचे संचालक अमर दाभोलकर यांनी पुरस्कृत केलेली मानाची पैठणी सन्मानपूर्वक देण्यात आली. द्वितीय विजेती रिया टेमकर हिला वक्रतुंड ज्वेलर्सचे संचालक भाऊ मालवणकर पुरस्कृत सोन्याची नथ देण्यात आली. तर उर्वरित सहा क्रमांकाच्या विजेत्या अनुक्रमे राणी पाखरे यांना तांब्याची टाकी, इंद्रायणी मठकर यांना ज्युसर, उर्मिला पेडणेकर व प्रिती जाधव यांना भेटवस्तू देण्यात आली. सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचा बाजारपेठ मित्रमंडळातर्फे आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मान केला. तर प्रथम तीन क्रमांंकाच्या विजेत्यांना “हेअर अॅण्ड हेवन’ संचालिका पूनम बोवलेकर यांच्याकडून मोफत ब्युटी पार्लर सेवा दिली जाणार आहे. स्पर्धेचे निवेदन नागेश नेमळेकर यांनी केले.

    बक्षिस वितरणप्रसंगी अशोक ठोंबरे, स्वप्निल पांडजी, जयेश गावडे, संदिप गावडे, महेश केरकर, विजय गावडे, बाळा आरावंदेकर, सदा पांजरी, सदा शारबिद्रे, घन्शा आरावूज, विजय विश्वकर्मा, राकेश सापळे, भाऊ मालवणकर, मिलिंद केरकर, विजय गुरखा, प्रितम जाधव, अशोक शेलार, श्री.पेडणेकर, बंटी केरकर, अतुल केरकर, श्री.मुणनकर, सुयोग चेंदवणकर, सौरभ पांजरी यांच्यासह बाजारपेठ मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

     शो टाईमच्या तिस¬या दिवशी ओमी डान्स अकॅडेमी प्रस्तुत हिंदी, मराठी बहारदार नृत्याचा कार्यक्रम संपन्न झाला. दीपावली शो टाईमच्या तिन्ही दिवशी प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता.

Leave a Reply

Close Menu